छोट्या डोळ्यांवर वक्तव्य करुन देशभरात प्रसिद्ध मिळवणारे नागालँड भाजपाध्यक्ष तेमजेन इम्ना अलोंग पुन्हा एक फोटो ट्विट करत चर्चेत आले आहेत. तेमजेन इम्ना अलॉन्ग सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. अनेकदा त्यांचे व्हायरल फोटो धुमाकूळ घालतात. यावेळीही असाच एक फोटो समोर आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मी झोपलेलो नाही.. नागालँड भाजपाध्यक्ष तेमजेन इम्ना अलोंग यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन स्वत:चाच फोटे शेअर केला आहे. ईशान्येकडील लोकांचे डोळे छोटे आहेत आणि त्यामुळे बरेच लोक त्यांना चिडवतात,तसेच अनेकांना चीनचे असल्याचे देखील बोलले जाते. हा फोटोही असाच काहीसा आहे. या फोटोमध्ये नागालँड भाजपाध्यक्ष तेमजेन इम्ना अलोंग मोबाईलमध्ये बघत आहेत. मात्र त्यांचे डोळे छोटे असल्यानं ते झोपलेत की काय असं वाटत आहे. आपल्याला ही शंका यायच्या आधीच तेमजेन यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणतात, मी झोपलेलो नाही तर, माझे पुढचे ट्विट तयार करत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पाहा पोस्ट - हेही वाचा - Video: खेकड्याशी मस्ती करणं आलं अंगलट; परत चुकूनही नाद करणार नाही… नागालँड भाजपाध्यक्ष तेमजेन इम्ना अलोंग यांनी शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत २० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर अनेकजण या फोटोवर कमेंट्स करतायत.अनेक वेळा ते युजर्सच्या प्रश्नांना उत्तर देतानाही दिसतात.