पुणे : मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक चांगली होत असल्याने बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यपााऱ्यांनी दिली. मेथी, पालक, कांदापातीच्या दरात घट झाली आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (७ एप्रिल) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून ५ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात, कर्नाटकातून मिळून ३ टेम्पो कोबी, ३ टेम्पो घेवडा, ३ टेम्पो भुईमुग शेंग, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून ७ टेम्पो शेवगा, राजस्थानातून २ ट्रक गाजर, मध्य प्रदेशातून १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५०० गोणी, भेंडी ७ टेम्पो, गवार ७ टेम्पो, टोमॅटो १० हजार पेटी, हिरवी मिरची ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, फ्लाॅवर १० टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, काकडी १० टेम्पो, शेवगा ४ टेम्पो, पारनेर भागातून ५०० गोणी मटार, कांदा १०० ट्रक तसेच इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून ३० ट्रक बटाटा अशी आवक झाली.

school boy electrocuted pune marathi news
पुणे: आनंद मेळ्यात विजेच्या झटक्याने शाळकरी मुलाचा मृत्यू; कात्रज-कोंढवा रस्ता येथील घटना
pune mba cet marathi news, mca cet marathi news
आणखी दोन अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे, अर्ज नोंदणीसाठी १८ एप्रिलपर्यंत मुदत
pune school girl suicide, pune school girl attempts suicide
धक्कादायक! तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; लोणी काळभोर येथील घटना
Pune, Doctor Cheated, rs 5 crore, religious settlement Scam , case registered against 5 persons, Pune Doctor Cheated rs 5 crore, religious settlement Doctor Cheated,
स्वर्गप्राप्तीच्या आमिषाने डॉक्टरची पाच कोटींची फसवणूक

हेही वाचा : पुणे: वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशाच्या आमिषाने ६९ लाखांची फसवणूक

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर दीड लाख जुडी, मेथीच्या ६० हजार जुडी अशी आवक झाली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर कोथिंबीर ८०० ते १५०० रुपये, मेथी ८०० ते १२०० रुपये, शेपू ६०० ते ८०० रुपये, कांदापात ८०० ते १००० रुपये, चाकवत ४०० ते ६०० रुपये, करडई ३०० ते ७०० रुपये, पुदिना ३०० ते ६०० रुपये, अंबाडी ४०० ते ७०० रुपये, मुळा ८०० ते १५०० रुपये, राजगिरा ४०० ते ७०० रुपये, चुका ४०० ते ८०० रुपये, चवळई ३०० ते ७०० रुपये, पालक ८०० ते १२०० रुपये असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.