Nag Panchami 2025 Video: श्रावणातील सर्वात पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. या सणापासून श्रावणातील सर्व सणांना सुरुवात होते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात नागपंचमी सणाचा उत्साह पाहायला मिळतो. नागपंचमीला नागदेवतासह भगवान शंकराची मनोभावे पूज केली जाते.
नागपंचमीनिमित्त घरोघरी नागाची मनोभावे पूजा केली जाते. हिंदू धर्मात नाग देवतेचा संबंध देवी-देवतांशी जोडला गेला आहे. पण सोशल मीडियावरील व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. कारण काही जणांनी या दिवसाचं औचित्य साधत नागाचं बर्थडे सेलिब्रेशन केल्याचं दिसत आहे. या व्हिडीओत काही मुलं टाळ्या वाजवून नागाचा बर्थडे सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. जवळपास पाच ते सहा तरूण नागाच्या जवळ उभे राहून हॅपी बर्थडे म्हणताना दिसत आहेत. फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी या तरूणांनी नागाजवळ उभे राहण्याचा धोका पत्करला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ते अद्याप स्पष्ट नाही. व्हिडिओत सुदैवाने कुठलाही अनूचित प्रकार घडल्याचे दिसत नाही.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे, हे मात्र कळू शकलेलं नाही. पण नागपंचमी पाहता व्हिडीओ व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या एक नाग फणा काढून उभा असल्याचं दिसत आहे. त्याच्याभोवती मुलांनी रिंगण केलं आहे. तसेच हॅप्पी बर्डथे टू यू नागोबा…भाई का बर्थ असं बोलत पार्टी मागत आहेत. खाली दिलेला व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ maharashtra_remix_reel नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. काही जणांनी या व्हिडीओ संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सापासोबत असं करू नका असा सल्ला काही जणांनी दिला आहे. तर काही जणांनी हे घातक असून मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे असं काही करु नका असा सल्ला तरुणांना दिला आहे.