सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कोणी रस्त्यावर नाचताना दिसते, कोणी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालतात तर कोणी अश्लील चाळे करताना दिसतात. हे व्हायरल व्हिडिओ आपल्याला आपल्या समाजाचा आरसा दाखवत आहे. आपल्या आसपास अनेकदा असे विचित्र प्रकार घडतात जे आपल्याला समाज म्हणून आपण कोणत्या दिशेने जात आहोत यावर विचार करण्यासाठी भाग पाडतात. सध्या अशाच एका व्हिडीओची चर्चा होत आहे.

नागपुरातील एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक तरुण मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे, तो आपल्या अशाच आपल्या शुद्धीत नसलेल्या मैत्रिणीला उचलण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो तरुण तिला घेऊन जाताना त्याचा तोल सांभाळण्यासाठी धडपडत आहे आणि शेवटी ते दोघेही जमिनीवर कोसळतात. हे फुटेज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

नुकतेच नागपुरात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मोठी लाट पाहायला मिळत आहे. याआधी, एका तरुण जोडप्याचा चालत्या कारमध्ये अयोग्य वर्तन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. यानंतर एका व्यक्तीने आपल्या मैत्रिणीसोबत बाईकवर अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता, आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण स्वतःचा तोल सांभाळत आपल्या मैत्रिणीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे.

नागपुरातील बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. फुटेजमध्ये तरुण आणि तरुणी रस्त्याच्या कडेला दिसत आहेत. ती तरुणी स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही असे दिसते, ज्यामुळे त्या तरुणाने तिला आधार देण्याचा आणि तिच्याबरोबर चालण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तो तिला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा तोल जातो. ज्यामुळे ते दोघेही पडले. या तरुणीच्या अवस्थेला कोणतेही पदार्थ सेवन कारणीभूत असू शकते का? असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.

हेही वाचा – कंबरेपर्यंत साचलेल्या पाण्यात व्हॉलीबॉल खेळत आहेत हे तरुण, Viral Video पाहून आठवतील बालपणीचे दिवस

या व्हायरल व्हिडिओच्या मूळ तारखेची पुष्टी झालेली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी या व्हिडीओबाबत अनेक महाविद्यालयांमध्ये चौकशी सुरू केली आहे परंतु अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या आठवड्यात, आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक तरुण जोडपे नागपुरात चालत्या कारमध्ये अयोग्य वर्तन करत होते. या व्हिडीओची सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती, ज्यामुळे या प्रकरणातील व्यक्तींना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी ठाण्यात बोलावले आहे.