Viral Video : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. उपराजधानी नागपूरमध्ये कडाक्याची उष्णता जाणवत आहे. उन्हाळ्यात तर येथे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसतो.अशात लोक गरमीपासून वाचण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार कपडे घालतात. सध्या नागपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की शॉर्ट घातल्यामुळे एका तरुणाला चक्क नागपूरच्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश दिला नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की शॉर्ट घातलेला एक तरुण मुलगा बँकेच्या सुरक्षा रक्षकाबरोबर वाद घालताना दिसत आहे. या सुरक्षा रक्षकाने त्याला बँकेच्या दरवाज्यावर थांबवले कारण त्याने शॉर्ट पॅन्ट घातली होती. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुण सुरक्षा रक्षकाला म्हणतो, की शॉर्ट पॅन्ट घालणे का चालत नाही? येथे लिहून ठेवा शॉर्ट पॅन्ट चालत नाही. गरमीच्या ऋतूमध्ये माणूस काय घालणार? मी पूर्ण कपडे घातले आहे. बोला बोला काका. तुमच्या बँकमध्ये मी रिपोर्ट करणार. हा व्हिडीओ तुमच्या बँकपर्यंत जाणार.” तरुणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल

Arhant Shelby या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. असा प्रकार पहिल्यांदा घडला नाही तर २०२१ मध्ये कोलकातामध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. अनेक युजर्सनी हा नियम चुकीचा आणि भेदभावाला प्रोत्साहन देणारा असल्याचे लिहिलेय आहे. एका युजरने लिहिलेय, “बँकमध्ये ड्रेस कोड आहे का?” तर एका युजरने लिहिलेय, “या काकाच्या हातात खूप जास्त अंगठ्या आहेत” आणखी एका युजरने विचारलेय, “खरंच बँकेत शॉर्ट पॅन्ट घालून जाऊ शकतो का?”