महाराष्ट्रातील नाशिक शहरात एका हल्लेखोराने एका महिलेवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना घडली आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेवर तरुणाने चाकूने लागोपाठ वार केले. यावेळी महिला मदतीसाठी धावत राहिली. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या सहकाऱ्यांनीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोराच्या हातात धारदार शस्त्र असल्याने ते घाबरले.

ही घटना गुरुवारी दुपारी नाशिकमधील पाथर्डी नाका येथील जाधव पेट्रोल पंपावर घडली. रिपोर्टनुसार, जखमी महिला पेट्रोल पंपावर काम करते आणि तिचे नाव झुबेदा शेख आहे. जाधव पेट्रोलियम पंपावर झुबेदा ड्युटी करत असताना त्याचवेळी एक व्यक्ती धारदार शस्त्र घेऊन तिथे आला आणि त्याने महिलेवर चाकूने लागोपाठ वार केले.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद:

गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून तरूणाने या महिलेवर चाकूने वार केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. महिलेच्या जबाबानंतरच घटनेचे कारण समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, या घटनेनं नाशिक शहर पुरतं हादरून गेलंय.