Girlfriend Day Day Shayari in Marathi: मंगेश पाडगावकरांच्या शब्दांत… प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आमचं सेम असतं… प्रत्येक जण कुणावर ना कुणावर प्रेम करत असतं. असं म्हणतात प्रेमात शायरी ही जादू घडू शकते आणि जी व्यक्ती प्रेमात असते ती नकळतच शायरीही करू लागते. अनेकजण आजही आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी शायरीचा सहारा घेतात. आज “गर्लफ्रेंड डे”च्या दिवशी आम्ही तुम्हाला अशाच काही स्पेशल शायरी, कविता आणि मेसेज सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला या प्रेमाच्या दिवशी मेसेज करू शकता किंवा ऐकवू शकता.
‘गर्लफ्रेंड डे’ मराठी कविता आणि शायरी
एक होकार दे फार काही नको
फार काही नको फक्त “नाही” नको
एकदा दोनदा ठीक आहे सखे
पण तुझे लाजणे बारमाही नको
थेट स्पर्शातुनी बोल काहीतरी
गुढ शब्दातली माैन ग्वाही नको
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…
हॅप्पी गर्लफ्रेंड डे!
शब्दाविना कळावं मागितल्याशिवाय मिळावं..
धाग्याविना जुळावं स्पर्शावाचून
ओळखाव तुझं माझं प्रेम!
हॅप्पी गर्लफ्रेंड डे!
“तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,
मागशील ते ठेवेल तुझ्या पुढ्यात
होकार कळव मला या क्षणात
प्रेमाच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”
हेही वाचा – National Girlfriend Day: तुमच्या प्रेमाला आज द्या ‘हे’ खास सरप्राईज; पुन्हा नव्यानं पडेल प्रेमात
“मला तुझंच बनून कायमचं राहायचंय,
हट्ट मााझे पुरवून घ्यायचेय,
मला हवं ते देशील ना ?
सांग मला स्विकारशील ना?
आपले सुंदर हे नाते निभावशील ना?
हॅप्पी गर्लफ्रेंड डे!
या शायरी, कविता आणि मेसेज तुमच्या प्रिया व्यक्तीला नक्की शेअर करा आणि त्यांचा दिवस खास बनवा.