सर्वत्र नवरात्री सण मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. गुजरातमध्येही नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा देखील नवरात्री उत्साहात साजरी करत आहे. नीरज चोप्रा गुजरातच्या वडोदरा येथे आयोजित नवरात्रीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता, जिथे त्याने चाहत्यांसोबत गरबा खेळण्याचा आनंद लुटला.

नीरज चोप्राचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही नीरज चोप्राच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. अनुराग ठाकूरने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गरबा ग्रुव नीरज चोप्रावर चालू झाला आहे. तू छान दिसत आहेस!’

( हे ही वाचा: Video: गावातील माणसाने ट्रकला बनवला चालता फिरता लग्नमंडप हॉल; आनंद महिंद्रा म्हणाले ‘मला भेटायचे आहे…’)

( हे ही वाचा: सुखोई लढाऊ विमानांसह चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची ‘नारी शक्ती’ सज्ज, IAF ची पहिली महिला टीम चीनच्या सीमेवर तैनात)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीरज चोप्राने यावर्षी मैदानावर चांगली कामगिरी केली. यादरम्यान त्याने दोन वेळा भालाफेकमध्ये स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याच महिन्यात, निरजने डायमंड लीग फायनलमध्ये ८८.४४ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजय मिळवला. हे विजेतेपद पटकावणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे.