एकीकडे जगभरातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये ट्विटर, Meta आणि Apple या कंपन्यांचाही समावेश आहे. शिवाय Microsoft देखील आपल्या १०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. त्यामुळे जगभरातील कंपन्या नोकरकपात करत असतानाच नेटफ्लिक्सने मात्र वार्षिक ३ कोटी रुपयांच्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर दिली आहे. नेटफ्लिक्सच्या या ऑफरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्सने या नोकरीबाबत आपल्या अधिकृत बेवसाइटवर माहिती दिली आहे. या माहितीनुसार, नेटफ्लिक्सने कॅलिफोर्नियातील सॅन जोसमध्ये लॉस गॅटोस मुख्यालयासाठी एका खाजगी जेट विमानासाठी फ्लाइट अटेंडंटची जागा काढली आहे. या ठीकाणी नोकरी करण्यासाठी कंपनी वार्षला ३ कोटी रुपयांचे पॅकेज द्यायला तयार आहे.

हेही वाचा- Twitter Layoffs :ट्विटरमध्ये आणखी कर्मचारीकपात? लवकरच निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता

कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर नोकरीबाबत माहिती देताना लिहिले आहे की, ‘तुमच्यामध्ये एविएशनच्या बाबत जोश आणि आवड आहे? तुम्हाला ‘ड्रीम क्रू’मध्ये काम करण्याची इच्छा असेल तर Netflix विमान वाहतूक विभाग एक सुरक्षित आणि गोपनीय हवाई वाहतूकीची सेवा देत आहे. नेटफ्लिक्सने म्हटलं आहे की, त्यांची एविएशन टीम नेटफ्लिक्सला अधिक कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे जगापर्यंत पोहोचण्यास मदत करत आहे. ज्यामुळे कंपनी जगभरात आनंद निर्माण करत राहिल.

हेही वाचा- Amazon Prime चे बेस्ट प्लॅन्स कोणते? पाहा संपूर्ण यादी

तसेच फ्लाइट अटेंडंट हा ‘सुपर मिडसाईज जेट’वरचा प्राथमिक फ्लाइट अटेंडंट असेल. तो एसजेसी स्टॉकरूमची देखभाल करेल आणि गरजेनुसार SJC फ्लाइट अटेंडंट G550 प्रवासालाही मदत करेल. तर या जॉबची सर्वात चांगली गोष्ट आहे ती म्हणजे, या कामासाठी मिळणारा पगार. हो कारण Netflix या नोकरीसाठी जवळपास ६० हजार ते ३ लाख ८५ हजार डॉलर इतका पगार देत करत आहे. भारतीय रुपयानुसार ही रक्कम जवळपास ३ कोटी इतकी आहे.

हेही वाचा- Jio Recharge Plan: दिवसभर Instagram Reels बघायचेत, जिओने आणले ‘हे’ सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन

या नोकरीबद्दल अधिकची माहिती देताना कंपनीने बेवसाइटवर लिहिले आहे की, ‘ही नोकरी उत्तर कॅलिफोर्नियामधील फ्लाइट अटेंडंटसाठी आहे आणि योग्य उमेदवाराला केबिन आणि प्रवासी सुरक्षा आणि विमान आपत्कालीन निर्वासन यामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. तसेच जे कोणी हा जॉबसाठी इच्छूक आहेत त्यांना प्रवाशांना स्वतंत्र निर्णय, विवेक आणि असामान्य अशी ग्राहक सेवा द्यावी लागेल.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflix took out a flight attendant vacancy salary will be rs 3 crore annually jap
First published on: 20-01-2023 at 15:13 IST