Video Viral: समाजमाध्यमांवर तरुणांचे जीममधील वर्कआउट करतानाचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात, ज्यावर अनेक व्ह्यूज, लाइक्स येतात. अनेकदा या व्हायरल व्हिडीओंमुळे इतर तरुणही व्हिडीओतील मुलांकडून प्रेरणा घेतात. दरम्यान, आता असाच एक प्रेरणादायी व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक ४९ वर्षांचा व्यक्ती अगदी २० वर्षांच्या मुलाप्रमाणे व्यायाम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून तरुण मंडळी यावर भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत.

या व्हिडीओतील व्यक्तीचं नाव वेंकट असून त्याने स्वतः हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वेंकट खांबाला लटकून व्यायाम करताना दिसत आहे. यावेळी तो व्यायामाचे काही कठीण प्रकारही करत आहे. या व्हिडीओत त्याचे ॲब्स स्पष्टपणे दिसत आहेत. वेंकेटच्या फिटनेसकडे पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. या शेअर केलेल्या पोस्टखाली त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “स्वप्न ते नाही जे आपल्याला झोपेत येते, स्वप्न ते आहे जे आपल्याला झोपू देत नाही!” हा व्हायरल व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.

हेही वाचा: स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! आईला शोधणाऱ्या हत्तीच्या पिल्लाचा Video Viral, नेटकरी झाले भावूक

पाहा व्हिडीओ:

वेंकटच्या या व्हिडीओला आत्तापर्यंत १६.९ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, वेंकट रॉक, सर्व तरुण शॉक; तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “भाऊ तुझं वय किती आहे? ” तर आणखी एकाने लिहिलंय की, “दादा आजपासून तू माझे प्रेरणास्थान आहेस.”

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, वेंकटने आणखी काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये वेंकटने जमिनीवर काही वीटा ठेवल्या आहेत. या वीटांच्या मदतीने तो पुश-अप्स मारताना दिसत आहे. यावरदेखील अनेक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. वेंकटचे इन्स्टाग्रामवर जवळपास ५५.४ फॉलोवर्स असून यावर तो वर्कआटचे विविध व्हिडीओ शेअर करत असतो.