तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर माणसा-माणसांचे, साप-कुत्र्याच्या व कुत्रा-कोंबड्याच्या भांडणाचे व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील; पण तुम्ही कधी माणूस आणि कोंबड्याच्या भांडणाचा व्हिडीओ पाहिला आहे का? तुम्हाला हे वाचून हसायलाही येऊ शकतं. पण या सत्याचं दर्शन करविणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुणी आणि कोंबडा यांच्या भांडणाच्या या व्हिडीओत एक कोंबडा तरुणीच्या पायाला बोचकारतो. त्यानंतर संतापलेली ती तरुणी कोंबड्याला बेदम मारहाण करते. या घटनेचा व्हिडीओ जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला; जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका कारखान्यात एक तरुणी फिरताना अचानक एक कोंबडा तिच्या पायाला येऊन बोचकारतो. त्यामुळे ती तरुणी संतापते आणि कोंबड्याला पकडून मारू लागते. आधी लाथेने मग फटका मारत ती कोंबड्याला दूर करण्याचा प्रयत्न करते. पण, त्यानंतरही कोंबडा तिच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे येतो. मग उत्तरादाखल ती तरुणीही त्याची मान पकडून गरकन फिरते आणि त्याला दूर फेकून देते. तिच्या या आक्रमक कृतीनंतरही तिचं समाधान होत नाही. त्यामुळे ती जवळच पडलेल्या काठीनं कोंबड्याला मारायला सुरुवात करते.

हेही वाचा – पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

हा व्हिडीओ एक्सवर @Gharkekalesh नावाच्या अकाउंटद्वारे पोस्ट करण्यात आला आहे; जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं की, तरुणीविरोधात PETA वाल्यांनी कारवाई करावी. दुसऱ्या युजरनं लिहिलं की, भाऊ, हे तर मोठं भांडण झालं राव. तिसऱ्यानं गमतीनं लिहिलं की, चिकन खाण्यासाठी आहे; मारण्यासाठी नाही.