सोशल मीडियावर असे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये दिसते एक आणि प्रत्यक्षात मात्र त्यामध्ये दुसरेच काहीतरी असते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला व्हायरल होत आहे. या १७ सेकंदाच्या व्हिडीओने अनेक लोकांना विचार करायला भाग पाडलं आहे. कारण व्हिडीओत तुम्हाला जे दृश्य दिसत आहेत ते खरे नसून खोटे आहे यावर अनेकांता विश्वास बसत नाहीये. तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीदेखील क्षणभर विचारात पडाल यात शंका नाही.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक वस्तू फिरताना दिसत आहे. तिच्याकडे पाहून कोणाचाही विश्वास बसेल की ती पूर्णपणे गोलाकार आहे आणि तिच्यावर अनेक थर आहेत. मात्र वस्तूवरुन कॅमेरा दुसऱ्या बाजूला जाताच आपल्या लक्षात येते की आपण जे पाहत होतो तसं काहीच नसून हा व्हिडीओ ऑप्टिकल इल्यूजन प्रकार आहे.

हेही वाचा- व्हिटॅमिनची गोळी समजून महिलेने गिळला पतीचा अ‍ॅपल एअरपॉड, मैत्रीणीशी बोलण्याच्या नादात केला विचित्र पराक्रम

आपण ऑप्टिकल इल्यूजनचे एकाहून एक फोटो सोशल मीडियावर पाहत असतो. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक गोंधळून जातात. पण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यावर त्यांच्या बुद्धीला चालना मिळते. कारण ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण नजर असते. अशी माणसं अशाप्रकारच्या टेस्टमध्ये पास होतात. त्यामुळे या व्हिडीओमध्येही जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर या व्हिडीओचे खरे गूढ तुमच्या लगेच लक्षात येऊ शकतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१२ सप्टेंबर रोजी @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “जबरदस्त ऑप्टिकल इल्यूजन” या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि १० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी याऑप्टिकल इल्युजनला आश्चर्यकारक म्हटलं आहे तर काहींनी हा डोकं फिरवणारा इल्युजन असल्याचं म्हटलं आहे. एका यूजरने लिहिलं, “हे पाहून माझं डोकं फिरलं.” काहींनी प्रकरण काय आहे हे शेवटपर्यंत कळलं नसल्याचं म्हटलं आहे. तरएका व्यक्तीने गे सर्वोत्तम ऑप्टिकल इल्युजन असल्याचं म्हटले आहे.