Python Viral Video: जगभरात सापांच्या हजारो प्रजाती असल्या तरी काही साप असे असतात, जे पाहिल्यावर अंगावर काटा येतो. अशाच महाकाय आणि धडकी भरवणाऱ्या अजगराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. याच अजगराच्या एका हालचालीनं, जंगलात झाडावर चढून वाचू हे तुमचं स्वप्नही चुरगळून टाकलंय.
साप हा जीव पाहिला की सर्वसामान्य माणसाच्या अंगावर शहारा येतो. त्याच्या विषारी फुत्काराने अनेक जीव गमावले गेले आहेत. जंगलात अजगरासारखा भला मोठा साप समोर आल्यानंतर बहुतांश लोक त्यापासून वाचण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्न करतात. पण, जर तुम्ही अजगरासमोर असं काही करणार असाल तर ही चूक तुमच्या जीवावर बेतू शकते, कारण हा साप केवळ जमिनीवर नव्हे तर झाडांवर चढण्यातही माहीर असतो.
हा अजगर सामान्य नाही… कारण तो जमिनीवरच नाही, तर झाडांवरही तितकाच घातक आहे. जंगलात अशी चूक कुणी केली तर सुटका अशक्य आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय पाहा, कसा हा अजगर झपाट्याने झाडावर चढतो.
सध्या सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक अजगर झाडावर चढताना दिसतोय; तेही इतक्या सहजतेने आणि वेगाने की डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण वाटतं. या व्हिडीओमध्ये दिसतं की, एक मोठा अजगर हालचाली करत झाडावर झपाट्याने वर चढतो. हा व्हिडीओ बघून अनेकांना धक्का बसलाय, कारण बहुतेक लोक अजगर फक्त जमिनीवरच फिरतो असं समजतात.
या व्हिडीओवर एका युजरने लिहिलं, “पुढच्या वेळी जर अजगर समोर दिसला, तर कृपया झाडावर चढण्याचा प्रयत्न करू नका. या सापांच्या काही प्रजाती झाडांवर सहज चढू शकतात. त्या आपले स्नायू वापरून झाडाच्या फांद्यांवर पोहोचतात.”
काही युजर्सनी व्हिडीओतील अजगराची प्रजाती ‘रेटिक्युलेटेड पायथन’ असल्याचं सांगितलं आहे. ही प्रजाती झाडांवर चढण्यात विशेष प्रावीण्य असलेली मानली जाते. म्हणूनच जंगलात अशा अजगराला समोर पाहिल्यास झाडावर चढणे सुरक्षित वाटत असलं, तरी प्रत्यक्षात ते अधिक धोकादायक ठरू शकतं.
काही लोकांनी कमेंटमध्ये लिहिलं की, “हे अजगर झाडावर चढतात हे माहिती नव्हतं, आता जंगलात पाऊल टाकताना दोनदा विचार करावाच लागेल.”
येथे पाहा व्हिडीओ
सावध : जंगलात अजगर दिसला की झाड ही सुरक्षित जागा नाही. व्हिडीओ पाहा, अनुभव घ्या आणि शेअर करा ही महत्त्वाची माहिती, जी तुमच्या आणि इतरांच्याही जीवाला वाचवू शकते.