भारतीय नववधू म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर उभी राहते ती नखशिखान्त नटलेली, डोक्यावर पदर घेतलेली, थोडीशी लाजरी मुलगी. पण ही संकल्पनाच हळूहळू बदलत चालली आहे. आता या मध्यप्रदेशमधल्या नववधूचं घ्या ना! तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे. एमपीमधल्या बागेलखंड इथला हा व्हिडिओ आहे. इथल्या रिवाजानुसार नव्या नवरीने नृत्य करण्याची पद्धत आहे. तेव्हा आपल्या कुटुंबियांसमोर नवरीनं ठेका धरला. राजू पंजाबीच्या ‘भान का रोला’ या गाण्यावर ती नाचत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसिसच्या दहशतवाद्याने पळून जाण्यासाठी मुर्खपणाचा कळस गाठला

या पूर्ण कार्यक्रमात तिने आपल्या डोक्यावरचा पदर अजिबात खाली पडू दिला नाही. पदर डोक्यावर ठेवून ती पारंपारिकच नाही तर वेस्टर्न स्टाईलने देखील डान्स करत होती. तेव्हा साडी आणि घुंघटमध्ये असलेल्या नवऱ्यामुलीचा ‘बोल्ड आणि ब्युटीफुल’ अंदाज काही लपून राहिला नव्हता. गेल्या महिन्यात हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता, जो सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय.

मंदिरातील पूजेसाठी कॅनडाचे पंतप्रधान ‘देसी लूक’मध्ये

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newly bride veil dance goes viral on social media
First published on: 24-07-2017 at 13:29 IST