Viral Video : मैत्री हे जगावेगळे नाते आहे. प्रत्येकाच्या आयु्ष्यात या नात्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येकाला एक जवळचा किंवा हक्काचा मित्र असतो. त्या मित्रासाठी आपण वाट्टेल ते करायला तयार असतो. मग ती मैत्री बालपणीची असो की वृद्ध वयातील, ती नेहमी खास असते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी मैत्रीणीसाठी गाणं गाते आणि गाणं ऐकताच तिच्या मैत्रीणीचे अश्रु अनावर होतात. सध्या हा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांचे शाळा कालेजातील जुने दिवस आठवतील तर काही लोकांना त्यांचे जीवलग मित्र मैत्रीणी आठवतील. सध्या या व्हिडीओची एकच चर्चा रंगली आहे.

या व्हायरल व्हिडीओ एका मेडिकल कॉलेजातील आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी हातात माइक घेऊन गाणं गाताना दिसत आहे. तिच्या अवतीभोवती कॉलेजातील तरुण मंडळी घोळका करून उभे आहेत आणि तिच्याबरोबर गाणं गाताना आणि टाळ्या वाजवताना दिसत आहे. “जब कोई बात बिगड जाये जब कोई मुश्किल पड जाये तुम देना साथ मेरा ओ हमनवा” हे लोकप्रिय गीत तरुणी गाताना दिसत आहे. ही तरुणी हे खास गीत तिच्या मैत्रीणीसाठी गाताना दिसत आहे. तरुणीचे गीत ऐकून तिची मैत्रीण भावूक होते आणि धावत येत तिला मिठी मारते. त्यानंतर पुढे व्हिडीओत तरुणीच्या मैत्रीणीला अश्रु अनावर होतात आणि ढसा ढसा रडते. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : मुंबईच्या जुहू बीचवर पुन्हा एकदा दिसला डॉल्फिन; मात्र सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल होण्याचं कारण काय?

dr.anshulapandit_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे अतिशय सुंदर होतं. धन्यवाद अनुजा माझ्यासाठी नेहमी तु स्पेशल करते.” गाणं गायलेल्या या तरुणीचे नाव अनुजा आहे आणि तिच्या मैत्रीणीने म्हणजेच अंशुलाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरी मैत्री कधीही तुटत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “एक मैत्रीण जेव्हा सर्वांसमोर तिचे प्रेम व्यक्त करते तेव्हा समजायचे की ही मैत्री खरी आहे” आणखी एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “मी जर गाणे गायले तर माझे मित्र हसणार माझ्यावर” एक युजर लिहितो, “नशीबवाल्यांना मिळतात असे मित्र मैत्रीणी” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी त्यांच्या मित्र मैत्रीणीला टॅग करत प्रेम व्यक्त केले आहेत.