निसर्गातील प्रत्येक पक्षाचे स्वतःचे एक वैशिष्ट्य आहे. पक्षी देशात प्रत्येक ठिकाणी आढळतात. अनेकदा सकाळ कावळा किंवा कोकीळ या पक्षांच्या किलबिलाटाने होते. जगातील मोजक्याच देशात आपल्या देशासारखी पक्षांची संख्या असेल. तर आज सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ३३ वर्षानंतर पश्चिम घाटात फुलपाखराची एक नवीन प्रजाती आढळून आली आहे ; हे सांगण्यात आले आहे .

भारतीय प्रशासकीय सेवा आयएएस (IAS) अधिकारी सुप्रिया साहू यांनी एक्स (ट्विटर) वर फुलपाखराच्या नवीन प्रजातीचा फोटो शेअर केला आहे. ३३ वर्षांनंतर पश्चिम घाटात फुलपाखराची नवीन प्रजाती दिसून आली आहे. या नव्याने सापडलेल्या प्रजातीला ‘सिगारिटिस मेघमलायन्सिस’ (Cigaritis Meghamalaiensis) असे नाव देण्यात आले आहे. तसेच या शोधामुळे पश्चिम घाटातील फुलपाखरांच्या एकूण प्रजातींची संख्या ३३७ वर पोहोचली आहे.

हेही वाचा…वचन अन् अखेरचा क्षण! शिक्षकाने रुग्णालयातच बेडवर बसून दिल्या विद्यार्थ्यांना ग्रेड…

पोस्ट नक्की बघा :

तामिळनाडूच्या मेगामलाई येथील श्रीविलिपुथूर व्याघ्र प्रकल्पातील संशोधकांनी सिल्व्हरलाइन फुलपाखराची ही नवीन प्रजाती शोधली आहे. डॉक्टर कलेश सदाशिवम, थिरु रामासामी कामया आणि डॉक्टर सी.पी राजकुमार यांनी थेनी येथील वनम या एनजीओकडून या प्रयत्नाचे नेतृत्व केले. ३३ वर्षांनंतर शोधण्यात आलेली ही फुलपाखराची नवीन प्रजाती असून या शोधामुळे पश्चिम घाटातील फुलपाखरांची एकूण संख्या ३३७ पर्यंत वाढली आहे आणि यात ४० पश्चिम घाटातील स्थानिक प्रजातींचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट आयएएस (IAS) अधिकारी सुप्रिया साहू यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @supriyasahuias या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. तुम्ही पोस्टमध्ये पाहिलं असेल की, एका निळ्या रंगाच्या फुलपाखराचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे आणि या फुलपाखरू संबंधित माहिती कॅप्शनमध्ये लिहिली आहे.