जुन्या काळात लग्न करायचे म्हटले की, आई-वडील ज्या मुलाला पसंत करतील त्याच मुलाशी मुलीचे लग्न लावून दिले जायचे. मात्र, आता तो काळ गेला आहे. आताची तरुण मुले-मुली एखादी व्यक्ती पसंत पडली की, आधी ‘रिलेशनशिप’मध्ये येऊन, एकमेकांना पूर्णपणे समजून घेऊन, मगच त्याच्याशी वा तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे लग्न झाल्यानंतरदेखील पत्नी आपल्या नवऱ्याला नावानिशी हाक मारते. मात्र, नवऱ्याला नावाने हाक मारण्याची ही पद्धत अगदी गेल्या काही वर्षांमध्येच आपल्याकडे आत्मसात केली गेली आहे.

मग पूर्वीच्या काळी नवऱ्याचे नावदेखील न घेणाऱ्या बायका त्यांना कशा हाक मारत असतील? त्यासाठी आपल्या मराठी भाषेमध्ये ‘अहो’ नावाचा एक अत्यंत गोड असा शब्द आहे. बायकोच्या तोंडून ‘अहो, ऐकता का?’ एवढे तीन शब्द ऐकताच नवरेमंडळी आपल्या जोडीदाराला काय म्हणायचे आहे हे ऐकून घेण्यासाठी हजर असायचे. मात्र आता, ‘अहो’, ‘इकडची स्वारी’, ‘धनी’ हे शब्द फारसे कानांवर पडत नाहीत.

हेही वाचा : Video : १२ नातवंड असलेल्या ५८ वर्षीय आजीबाईने रचला विश्वविक्रम! तब्बल ‘साडेचार तास’ केले प्लँक

परंतु असे असतानाही, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा आणि त्यांच्या सासरच्या मंडळींनी केलेल्या हट्टाचा एक गोड व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. smilesandpostcards नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. त्यामध्ये ‘लग्नानंतर कुटुंबीय मला माझ्या नवऱ्याला मराठमोळ्या पद्धतीनं हाक मारायला सांगत आहेत’ असा मजकूर लिहिलेला दिसतो. तसेच सोफ्यावर हिरव्या रंगाचा ड्रेस आणि मंगळसूत्र घालून बसलेली एक तरुणी दिसत आहे.

व्हिडीओमध्ये पुढे ती तरुणी आपल्या नवऱ्याला ‘अहो’ अशी हाक मारते. ती हाक ऐकून, तिचा नवरा हसत आणि खूपच लाजत दुसऱ्या खोलीच्या दारातून तिच्याजवळ चालत येऊन उभा राहतो. तरुणीने नवऱ्याला ‘अहो’ अशी हाक मारताच तिच्या सासरची [कदाचित] मंडळीदेखील मजा-मस्करी करीत हसत असल्याचे आपण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहा.

“आई गं! हा इतका गोड व्हिडीओ पाहून मीच प्रचंड लाजत आहे. मला माझे हसूच आवरत नाहीये”, असे एकीने लिहिले आहे.
“”बेबी, शोना नव्हे… अहो इथे या, हेच मस्त आहे”, असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“माझी लग्न करण्याची इच्छा वाढवण्याबद्दल खूप खूप आभार!” असे तिसऱ्याने म्हटले आहे.
“पण, हा व्हिडीओ पाहून मी का एवढी लाजत आहे?” अशी प्रतिक्रिया चौथ्या युजरने दिली आहे.

हेही वाचा : भारतातील सर्वांत शक्तिशाली चिमुरडी! पाहा नऊ वर्षीय ‘धाकड’ मुलीचे शक्तिप्रदर्शन; Video पाहून व्हाल थक्क…

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @smilesandpostcards नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला आत्तापर्यंत १८.९ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.