शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याला ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे हे काही समर्थक आमदारांसोबत सुरतमध्ये गेले. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेनं भाजपासोबत येऊन सरकार स्थापन करावं अशी मागणी केली आहे. त्यातच आता या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलेत.
नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार
“महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने,” असं राऊतांनी ट्विटरवरुन म्हटलंय. या ट्विटनंतर आता राज्यामध्ये सत्तेत असणारं महाविकास आघाडी सरकार पडणार आणि नव्याने सरकार सत्तेत येणार अशी शक्यता अधिक बळावलीय. असं असतानाच या साऱ्या राजकीय घडामोडींवरुन भाजपाचे नेते निलेश राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरे, संजय राऊतांसोबत बाचाबाची; दोन दिवसांपूर्वीच पडलेली वादाची ठिणगी
महाराष्ट्र प्रदेश सचिव असणाऱ्या निलेश राणेंनी सध्या शिवसेनेसोबत एकूण ११ ते १२ च आमदार असल्याचं चित्र दिसत असल्याचा संदर्भ देत या आमदारांना घेऊन आयपीएलप्रमाणे क्रिकेटचा संघ सुरु करावा असा खोचक सल्ला दिलाय. तसेच पक्ष चालवणं हे उद्धव ठाकरेंचं काम नाही असंही निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलंय. “शिवसेनेचे ११ ते १२ आमदार शिवसेनेसोबत राहतील अशी परिस्थिती आहे. पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे ११/१२ घेऊन आयपीएल टीमसाठी तयारी करा… मातोश्री ११ बनवा”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
नक्की वाचा >> मोठा खुलासा! शरद पवारांनाही भेटीची वेळ देत नव्हते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; चार ते पाच महिन्यांपूर्वीच पवारांनी…

मंगळवारी म्हणजेच २१ जून रोजी सुरु झालेल्या या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी ट्विटरवरुन, “ठाकरेंचे दिवस फिरले…” असं म्हणत पहिली प्रतिक्रिया दिलेली.
नक्की वाचा >> भायखळा ते भंडारदरा अन् पैठण ते अंबरनाथ… एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या शिवसेनेच्या ३३ बंडखोर आमदारांची यादी पाहिलीत का?
आकडेवारी काय सांगते?
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण २८८ आमदार आहेत. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या पक्षाकडे १४५ जागा आमदरांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे समर्थन आहे. यापैकी राष्ट्रवादीचे ५३ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. शिवसेनेच्या ५६ आमदारांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंना केवळ २५ आमदारांचीच गरज आहे.
नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”
मात्र, एकनाथ शिंदेंनी आता आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केलाय. यामध्ये शिवसेनेचे ३३ आमदार असून इतर समर्थन करणाऱ्या अपक्ष आमदारांचा समावेश आहे.