अनेक महामार्ग जंगलाच्या जवळून जातात, त्यामुळे अशा महामार्गांवरती अनेक जंगली प्राणी प्रवास करताना आपणाला दिसतात. तर कधी कधी या प्राण्यांमुळे आपणाला किंवा त्यांना इजा होते. शिवाय रस्त्यांवर रान रेडा किंवा नील गाईंचा कळप दिसणं सामान्य बाब आहे. असे कळप वाहन चालकांसाठी अडचणीचे ठरतात. अनेकदा अशा प्राण्यांमुळे अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. पण सध्या एका नील गायीच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील आहे. ज्यामध्ये एक नील गाय कारची काच फोडून आत शिरल्याचं दिसत आहे. शिवाय या अपघातामध्ये ती पुर्णपणे अडकली असून तिचे संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झाल्याचंही पाहायला मिळत हाआहे. ही गाय कारच्या समोरील काच फोडून दुसऱ्या बाजूने तिचे डोके खिडकीतून बाहेर आल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हेही पाहा- पुरात अडकल्या गाड्या, बसचालकाने घेतली मोठी रिस्क; वाऱ्याच्या वेगाने जे घडलं.. Video पाहून उडेल थरकाप

हा अपघात इतका भीषण होता, ज्यामध्ये कार मालकही गंभीर जखमी झाला आहे. ही घटना हापूरच्या झडीना गावच्या जंगलातील असल्यायचं सांगितलं जात आहे. शिवाय या नील गाईला बाहेर काढल्यानंतर तीचा तडफडून मृत्यू झाला झाला. ही घटना जुनी असली तरी त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

असा झाला अपघात –

हेही पाहा- “रानटी कोण?” कुत्र्याच्या पिल्लाला क्रूरपणे हवेत भिरकवतानाचा Video व्हायरल; प्राणीप्रेमींनी व्यक्त केला संताप

कार चालक फुरकान अहमद आपल्या कारमधून गावी परतत असताना मध्य गंगा कालव्याच्या मार्गावरील झडीना गावात त्याच्या कार समोर अचानक एक नील गाय आली. नील गाईचा वेग इतका होता की, ती थेट कारच्या समोरच्या काचेमधून आत शिरली.

नील गाईचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारमध्ये नील गाय अत्यंत वाईटरित्या अडकली होती. त्यामुळे तिला लवकर बाहेर काढता आलं नाही. दरम्यान, ज्यावेळी तिला बाहेर काढण्यात आलं तेव्हा तिचा मृत्यू झाला. तर वनविभागाची टीम योग्य वेळी पोहोचली असती तर गाईचा जीव वाचू शकला असता, असं नेटकरी म्हणत आहेत.