Nita ambani jwellary collection: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमीच चर्चेत असतात. निता अंबानी या जगात सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत. डिझायनर साड्या, लेहेंगे आणि दागिन्यांचे खास कलेक्शन नीता अंबानी यांच्याकडे आहे. नीता अंबानी त्यांच्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. कोणताही कार्यक्रम असो सर्वांच्या नजरा या नीता अंबानी यांच्याकडे असतात. त्यांच्या आवडीही यूनिक आहेत. नुकतेच त्यांना मिस वर्ल्ड फायनलमध्ये ‘ब्युटी विथ पर्पज ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड’ने गौरविण्यात आलं. यावेळी त्यांनी नेसलेली साडी आणि त्यावरील दागिने सध्या चर्चेत आले आहेत. या कार्यक्रमात निता अंबानी यांनी मुघल सम्राट शाहजहान यांचा बाजूबंद घातला होता. मात्र याती किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

मुघल सम्राट शाहजहानची कलगी

नीता अंबांनी यांनी नुकतीच मिस वर्ल्ड फायनलच्या दिमाखदार सोहळ्याला हजेरी लावली होती. हा अंतिम सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला होता. या सोहळ्यात नीता अंबानी यांनी परिधान केलेला बाजूबंद हा प्रत्यक्षात मुघल सम्राट शाहजहानची कलगी होती, असा दावा Topophilia या इन्स्टाग्राम पेजने केला आहे. ही कलगी नीता अंबानी यांनी बाजूबंदच्या स्वरूपात परिधान केली होती. या महागड्या बाजूबंदची किंमत ही तब्बल २०० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.या कलगीची सर्वात विशेष बाब म्हणजे हे सोन्याने बनले असून त्यात डायमंड, रूबी आणि स्पिनल्स आहे. याबद्दलची माहिती इंस्टा पेज ‘टोपोफिलिया’ दिली आहे.

पाहा निता अंबानींचे दागीने

हेही वाचा >> VIDEO: घरात लॉकर नव्हता तेव्हा सोनं कुठे ठेवलं जायचं? पूर्वी लोकं काय करायचे एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीता अंबानी यांना समाजात केलेल्या चांगल्या कामासाठी ‘ब्युटी विथ पर्पज ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.यावेळी नीता अंबानी यांनी सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाईन केलेली बनारसी जंगला साडीची निवड केली. मात्र या कार्यक्रमात निता अंबानी यांच्या साडीने नाहीतर ज्वेलरीने लक्ष वेधलं. नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या या बाजूबंदाची उंची ही १३.७ सेमी आणि रूंदी १९.८ आहे. हा संपूर्ण बाजूबंद सोन्याचा असून त्यावर हिरे, माणिक आणि मौल्यवान खडे आहेत. या पेजच्या दाव्यानुसार २०१९ मध्ये लिलावात विक्री होण्यापूर्वी हा सुंदर बाजूबंद ‘आय थानी’ कलेक्शनमध्ये शेवटचा पाहण्यात आला होता.