Premium

Birthday Special: नितीन गडकरींना YouTube कडून महिन्याला किती पैसे मिळतात?; स्वत:च म्हणाले होते, “आज मला महिन्याला…”

“आधी मी फारसा सोशल मीडियावर नव्हतो पण आज मला भाषणांसाठी युट्यूबकडून पैसे मिळतात आणि माझं महिन्याचं इनकम सुरु झालं आहे,” असं ते म्हणालेले.

Nitin Gadkari youtube income
Nitin Gadkari birthday: गडकरींनीच यासंदर्भात एका कार्यक्रमामध्ये बोलताना केलेला खुलासा (फाइल फोटो)

Nitin Gadkari Youtube Income: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६५ वा वाढदिवस. आपल्या कामाबरोबरच मनमिळवू स्वभावामुळे सर्वपक्षीय मित्रपरीवार असणाऱ्या नितीन गडकरींची भाषणं ही विषेश गाजतात. राजकीय आरोप प्रत्यारोपांपेक्षा किस्से आणि मजेदार गंमतीजमती सांगत गडकरी अनेक कार्यक्रमांमध्ये लक्ष वेधून घेताना दिसतात. करोना कालावधीमध्येही नितीन गडकरींनी युट्यूबवरुन वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यांची युट्यूबवरील भाषणंही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतात. मात्र ते या युट्यूबवरील भाषणांमधून किती कमाई करतात हे जाणून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. यासंदर्भात त्यांनीच साधारणपणे वर्षभरापूर्वी खुलासा केला होता.

नक्की वाचा >> २५ कोटी, कढी भात अन् अजित पवार… राष्ट्रवादीच्या नेत्यानेच जाहीर सभेत सांगितला ‘तो’ किस्सा; गडकरींनी हसून दिली दाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील वेगवेगळ्या विद्यापिठांमधील कुलगुरुंसोबत गडकरी यांनी मागील वर्षी १८ मे रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी गडकरींनी अनेक गोष्टींसंदर्भात खुलासा केला. खास करुन त्यांनी आपण सोशल मीडिया फारसं वापरत नव्हतो मात्र करोना कालावधीमध्ये त्याचा आपण जास्त वापर करु लागल्याचं सांगितलं. करोनामुळे आयुष्यामध्ये काय बदल घडलेत यासंदर्भात बोलताना गडकरींनी आपल्या दैनंदिन आयुष्याबरोबरच सोशल नेटवर्किंगमुळे घडलेल्या बदलांसंदर्भातही सांगितलं. याचवेळी त्यांनी स्वत:च्या यूट्यूब चॅनेलवरुन महिन्याला किती कमाई होते यासंदर्भातील माहितीही दिली. आधी मी फारसा सोशल मीडियावर नव्हतो पण आज मला भाषणांसाठी युट्यूबकडून पैसे मिळतात आणि माझं महिन्याचं इनकम सुरु झालं आहे, असं गडकरी म्हणाले होते.

करोनामुळे माझ्या आयुष्यात दोन तीन बदल झाले. रोज सकाळ संध्याकाळ मी २५ मिनिटं पायी चालतो. मी मोबाइलवर गाणी ऐकण्याबरोबरच युट्यूबवर अनेक व्हिडीओ पाहतो. मी युट्यूबवर भगवतगीताही ऐकू लागलो. मला दहावा अध्याय आणि त्याचं पूर्ण विवेचन शांततेत ऐकण्याची संधी या कालावधीमध्ये मिळाली. ही माझ्यासाठी मोठी उपलब्ध होती, असं गडकरी यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी करोनापूर्व कालावधीमध्ये आपण फार सोशल नेटवर्किंग फ्रेण्डली नव्हतो. मी त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवर फार सक्रीय नव्हतो. पंतप्रधान मोदी आम्हाला यासंदर्भातील माहिती देत यावर सक्रीय राहण्याचा आग्रह करायचे. मात्र मला ते जमत नव्हतं. करोना कालावधीमध्ये मी जवळजवळ ९५० व्हिडीओ कॉन्फरन्स घेतल्या. या कालावधीमध्ये ट्विटरवर एक कोटी २० लाख फॉलोर्स माझ्याशी नव्याने जोडले गेले, असं गडकरींनी सांगितलं होतं.

नक्की वाचा >> बिहार पूल दुर्घटना प्रकरणी IAS अधिकाऱ्याने दिलेलं कारण ऐकून गडकरी अवाक; म्हणाले “मला एक कळत नाही…”

पुढे हसतच आपल्या सोशल नेटवर्किंगवरील प्रगतीसंदर्भात बोलताना गडकरींनी, “मी युट्यूबवरुन जी भाषणं दिली त्यासाठी मला आता युट्यूबकडून पैसे दिले जातात. आज मला युट्यूबकडून महिन्याला चार लाख रुपये दिले जातात. हे पैसे मी कोव्हिडसंदर्भातील कामांसाठी देणगी म्हणून दिले आहेत,” अशी माहिती दिली होती. सोशल मीडिया आणि त्यामुळे आयुष्यात झालेले बदल हे माझ्यासाठी खूपच वेगळे अनुभव देणारे होते, असंही गडकरींनी यावेळी सांगितलं होतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nitin gadkari birthday special how much central minister earns through youtube scsg

First published on: 27-05-2022 at 08:21 IST
Next Story
नदीत मुलगा अंघोळ करत होता; अचानक इतका साप मोठा आला आणि…पुढे काय झालं, पाहा हा VIRAL VIDEO