Sainik School Satara Bharti 2024 : सैनिक स्कूल सातारा ही भारतातील नामवंत सैनिक शाळा आहे. सध्या सैनिक स्कूल सातारामध्ये विविध पदांची भरती सुरू आहे. या सैनिक स्कूल अंतर्गत पाच रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या टीजीटी आणि वॉर्ड बॉय पदांसाठी एकूण ५ रिक्त जागा आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, याविषयी आपण जाणून घेऊ या.

पदाचे नाव – सैनिक स्कूल सातारा अंतर्गत टीजीटी आणि वॉर्ड बॉय या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
पदसंख्या – टीजीटी आणि वॉर्ड बॉय पदांच्या ५ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
ZP Pune Bharti 2024 Zilla Parishad Pune conducted new recruitment
ZP Bharti 2024: पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या कसा कराल अर्ज…
  • टीजीटी – ०३
  • वॉर्ड बॉय – ०२

हेही वाचा : ZP Bharti 2024: पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या कसा कराल अर्ज…

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिसुचना नीट वाचावी.

नोकरी ठिकाण – नोकरीचे ठिकाण सातारा आहे.

वयोमर्यादा – पात्र उमेदवाचे वय २१ – ४० वर्ष असावे.

अर्ज पद्धती – या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज करावा.
मुख्याध्यापक, सैनिक स्कूल सातारा. PO Box No-२०, सदर बाजार, जिल्हा- सातारा (महाराष्ट्र) – ४१५००१

वेतन –

  • टीजीटी – ३८,००० रुपये/प्रति महिना
  • वॉर्ड बॉय – २५,००० रुपये/प्रति महिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – वरील पदांसाठी २५ एप्रिल २०२४ पूर्वी वरील पत्त्यावर अर्ज करावा.

अधिकृत वेबसाईट – या विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी http://www.sainiksatara.org या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावे.

अधिसुचना – या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर https://www.sainiksatara.org/images/School_web_site_Advt__03_Apr_24.pdf या लिंकवर क्लिक करून अधिसुचना नीट वाचावी.

हेही वाचा : ITAT Mumbai Recruitment 2024 : मुंबईत ‘आयकर’ विभागात नोकरीची संधी! पाहा भरतीची माहिती

अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
  • अर्ज करण्यापू्र्वी अधिसुचना नीट वाचावी.
  • अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी वरील पत्त्यावर पाठवावा.