Viral Video : एखाद्या शहरात जेव्हा आपण भाड्याने घर बघायला जातो तेव्हा त्या घरात सोयी सुविधा किती आहेत, हे आवर्जून पाहतो आणि त्यानुसार भाडं अपेक्षित करतो. प्रत्येक घराचं भाडं हे त्या घरात उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधांवर अवलंबुन असते. जर खोली किंवा फ्लॅट रिकामा असेल तर स्वस्त दरात मिळतो. जर फ्लॅट किंवा खोली पूर्णपणे फर्निश्ड असेल, तर त्याचा दर आपोआप वाढतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक एजंट असं घर दाखवतो जे बाल्कनी एवढे आहे पण याचं भाडं ऐकाल तर तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक एजंट घर दाखवताना दिसत आहे. हे घर पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कारण हे घर बाल्कनी सारखे दिसत आहे. जेव्हा हा एजंट फ्लॅटचा दरवाजा उघडतो तेव्हा हा फ्लॅट बाल्कनी एवढा दिसतो. या एजंटने या घराचं भाडं १२०० डॉलर म्हणजेच जवळपास एक लाख रुपये प्रति महिना सांगितले. व्हिडीओत हा एजंट म्हणतो की येथे या पेक्षा स्वस्त फ्लॅट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. या फ्लॅटमध्ये ना किचन ना बाथरुम आहे. त्यानंतर हा एजंट स्वत:च म्हणतो, “बाथरुम कुठे आहे?” त्यानंतर तो एक सार्वजानिक बाथरुम दाखवतो. टेन्शन घेऊ नका हा व्हिडीओ भारतातील नाही तर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील आहे पण या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No bathroom no kitchen rent of flat is rs 1 lakh per month in new york city of america video goes viral on social media ndj
First published on: 29-02-2024 at 18:22 IST