Anand Mahindra Viral Post:  उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अलीकडेच चिकू नावाच्या चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. यात चिमुकल्या चिकूने ७०० रुपयांना थार कार मिळेल का, असे विचारले होते. यावर आनंद महिंद्रा यांनीही फार भन्नाट उत्तर दिले होते. ‘७०० रुपयांना थार कार विकायला सुरुवात केली तर आम्ही लवकरच दिवाळखोर होऊ.’ यानंतर चिमुकल्याचा व्हिडीओ आणि त्यावर आनंद महिंद्रांचा ट्विट खूप व्हायरल झाले. चिमुकल्याला ते थार देऊ शकते नाहीत, पण त्यांनी त्याच्यासाठी असे काही केले जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

दरम्यान, या मुलाचा व्हायरल व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रादेखील त्याच्या प्रेमात पडले होते. यावेळी नेटिझन्स चिकूला आनंद महिंद्रा ७०० रुपयांना कार देणार का? असा सवाल करत होते. अशावेळी आनंद महिंद्रांनी त्या चिमुकल्याला थार नाही दिली, पण त्यांनी अशी एक गोष्ट केली की, तो ती आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. चिकूला थार ज्या ठिकाणी बनवली जाते त्या महिंद्रा कंपनीच्या मोठ्या प्लांटची सफर घडवून आणली.

आनंद महिंद्रा यांनी नुकतेच चिकूला महिंद्रा कंपनीच्या प्लांटमध्ये फिरतानाचा एक व्हिडीओ एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला चिमुुकल्याचा ७०० रुपयांना थार कार देणारा का, अशी मागणी करणारा व्हिडीओ जोडण्यात आला आहे. यानंतर चिकूला महिंद्रा कंपनीच्या प्लांटमध्ये एन्ट्री करताना आणि तिथे पोहचल्यावर थार कार कशी बनते हे पाहतानाचा व्हिडीओ आहे. यावेळी चिकूला भेट म्हणून महिंद्रा कारचे एक छोटे मॉडेल देण्यात आले. यावेळी चिकू फार मज्जामस्ती करतानाही व्हिडीओत दिसत आहे.

चिकूचा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की – “चिकू चाकणमधील महिंद्रांच्या प्लांटमध्ये गेला होता. एका व्हायरल व्हिडीओपासून ते एका वास्तविक जीवनातील घटनेपर्यंत… थारचा चाहता चिकू आमच्या चाकण प्लांटला भेट देतो आणि त्याच्याबरोबर गोड स्मित आणि प्रेरणा घेऊन येतो. आमचा सर्वोत्तम ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून होस्ट केल्याबद्दल @ashakarga1 आणि टीम @Mahindraauto चे धन्यवाद. मला आशा आहे की, यानंतर चिकू त्याच्या वडिलांकडे फक्त ७०० रुपयांमध्ये थार विकत घेण्यासाठी हट्ट करणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी जोरदार कमेंट करायला सुरुवात केली. एका युजरने लिहिले की, एक चांगली आठवण जी चिकू नेहमी त्याच्या हृदयात जपून ठेवेल. दुसऱ्याने लिहिले की, चिकू महिंद्राचा सर्वोत्कृष्ट आणि सर्वात प्रिय ब्रँड ॲम्बेसेडर आहे.