लहान मुलं अत्यंत निरागस असतात पण एखाद्या लहान मुलाचा निरागसपणा अंगणवाडीच्या मेन्युमध्ये महत्वाचा बदल करेल याची कोणी कल्पनाही केली नसेल. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण त्या व्हायरल व्हिडीओमुळे केरळमधील अंगणवाडीच्या जेवणाचा मेन्यु बदलला आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहे.
त्याचे झाले असे की,”काही दिवसांपूर्वी एका शंकू नावाच्या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामध्ये तो आपल्या आईला सांगतो की, “अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या जेवणात उपमा नको, बिर्याणी आणि चिकण फ्राय पाहिजे. त्याच्या आईे अश्वथी अशोक यांनी मुलाबरोबरचे संभाषण व्हिडीओमध्ये कैद केले आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला. हा हा म्हणता इतका व्हायरल झाला की त्याची दखल केरळच्या महिला आणि बालविकास मंत्री वीणा जॉर्ज यांच्यापर्यंत पोहचला. जॉर्ज यांनी चिमुकल्याच्या मागणीची दखल घेतली अंगणवाडीच्या मेन्युमध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला.
येथे पाहा Viral Video
https://www.facebook.com/veenageorgeofficial/videos/712500721158058
महिला आणि बालविकास मंत्री जॉर्ज यांनी अंगणवाडी (ग्रामीण बालसंगोपन केंद्रे) मधील जेवणाच्या मेनूमध्ये अंडी बिर्याणीचा समावेश केल्याची घोषणा केली आहे. मंत्री वीणा जॉर्ज, “शंकू नावाच्या या चिमुकलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याने त्याच्या आईला सांगितले की त्याला उपमा नको तर बिर्याणी आणि चिकन फ्राय नको आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्याच्या आणि इतर अनेक अंगणवाड्यांमध्ये बिर्याणीची मागणी केली.
“हे कसे शक्य होईल याबाबत आम्ही विचार केला. आम्ही अंगणवाड्यांमध्ये अंडी देत आहोत आणि आम्ही ते आठवड्यातून दोन दिवसांऐवजी आता आठवड्यातून तीन दिवस केले आहे. आम्ही अंगणवाडीच्या मुलांच्या जेवणात अंडा बिर्याणीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे जॉर्ज यांनी अंगणवाड्यांच्या राज्यस्तरीय पुनरागमन समारंभात बोलताना सांगितले.
नव्या मेनूमध्ये आता पौष्टिक लाडू (प्रथिने आणि फायबरयुक्त घटकांच्या मिश्रणापासून बनवलेले पोषक तत्वांनी समृद्ध लाडू), दाल पायसम (डाळ गूळ, नारळाच्या दुधापासून बनवलेले आणि वेलची टाकलेले पारंपारिक दक्षिण भारतीय मिष्टान्न), रागी आडा (पारंपारिक दक्षिण भारतीय नाश्ता), सोया ड्राय फ्राय आणि गव्हाचा पुलाव, अंडा बिर्याणीसह समाविष्ट आहे.
वीणा जॉर्ज असेही म्हणाल्या, “ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एकीकृत मॉडेल फूड मेनू तयार करण्यात आला आहे.”
४ वर्षीय शंकूचे अधिकृत नाव त्रिजल एस सुंदर आहे. त्याच्या वडीलांचे नाव सोमसुंदर आणि आईचे नावा अश्वथी असे आहे.