सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ कसा व्हायरल होईल सांगता येत नाही. पण प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असतात. प्राण्यांचा हरकती पाहून कधी कधी आश्चर्य वाटतं, तर कधी पोट धरून हसायला येतं. युजर्स त्यांच्या मोकळ्या वेळेत पाळीव प्राण्यांचे मजेदार आणि मनोरंजक व्हिडीओ पाहणं पसंत करतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये पाळीव प्राण्यांच्या विचित्र कृत्ये पाहायला मिळत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साधारणपणे उंच ठिकाणाहून पडल्यानंतर कोणत्याही प्राण्याला गंभीर दुखापत होते.अनेकदा मृत्यूचा धोका असतो. उंचावरून पडूनही एक मांजर सुरक्षित असल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दुकानावरील पत्र्याच्या शेडवर एक लहान मांजर फिरत असल्याचे दिसत आहे. या दरम्यान, ती निसरड्या जागेवर पाऊल ठेवताच ती वेगाने घसरते आणि उंचीवरून खाली पडते. कितीतरी पट उंचावरून पडल्यानंतर मांजर जमिनीवर अगदी व्यवस्थित उभी राहते. तिला अजिबात दुखापत झालेली दिसत नाही. इतकंच नाहीतर जमिनीवर पडल्यानंतरही व्यवस्थितरित्या पुढे चालत जाते.
मांजरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.