करोनाबाधित रुग्णासोबत शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी एका नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या नर्सने रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये करोनाबाधित रुग्णाबरोबर संबंध ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. घडलेला सर्व प्रकार करोनाबाधित रुग्णाने सोशल नेटवर्किंगवरुन पोस्ट केल्यानंतर दोघांनाही आयसोलेट करुन नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण इंडोनेशियामधील आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय आहे प्रकरण?

देशाची राजधानी असणाऱ्या जकार्तामधील करोना केंद्रात असणाऱ्या व्यक्तीने येथील एका नर्ससोबत शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक खुलासा सोशल नेटवर्किंगवरुन केला. या व्यक्तीने सोशल नेटवर्किंगवर नर्स आणि आपल्यामध्ये नक्की काय काय घडलं यासंदर्भातील सविस्तर माहिती तसेच व्हिडीओही पोस्ट केला. त्यानंतर या दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअप चॅटचे काही स्क्रॉनशॉर्टही या तरुणाने सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केले आहेत.

नक्की वाचा >> पारदर्शक PPE किटमध्ये लाँजरी घालून उपचार करणारी नर्स झाली मॉडेल; नोकरीही मिळाली परत

पोस्ट व्हायरल झाल्यावर काय झालं?

या व्यक्तीने केलेली पोस्ट व्हायरल झाल्यानंतर या दोघांची चौकशी करण्यात आली. दोघांनीही घडलेल्या प्रकरणाची कबुली दिली. जकार्तामधील विस्मा अ‍ॅटलेट करोना केंद्रातील टॉलेटमध्ये आम्ही हे कृत्य केल्याचं दोघांनाही मान्य केल्याचं द सनने दिलेल्या वृत्ता म्हटलं आहे. शरीरसंबंध ठेवण्यासाठी या व्यक्तीने स्वत:च्या अंगावरील पीपीई सूटही फाडल्याची कबुलीही दिलीय.

अधिकारी काय म्हणतात?

या प्रकरणामध्ये दोघांनाही अटक करण्यात आली आहे अशी माहिती स्थानिक लष्कर प्रमुखांनी दिलीय. लेफ्टनंट कर्नल अर्ह हेरवीन बीएस यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचं काम जकार्ता पोलिसांकडून केलं जात असल्याचंही सांगितलं. या प्रकरण केंद्रामधील इतर कर्मचाऱ्यांनी साक्षीदार म्हणून समोर यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असंही हेरवीन यांनी म्हटलं आहे. या नर्सच्या संपर्कात आलेल्या अनेकांना सध्या आयसोलेट करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> लॉकडाउनचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मारला छापा; घरात ५० जण करत होते Sex Party

करण्यात आली करोना चाचणी

हे दोघेही सध्या जकार्ता पोलिसांच्या ताब्यात आहेत. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर दोघांचीही करोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आलाय तर नर्स करोना निगेटीव्ह आहे. मात्र करोना हा संसर्गजन्य रोग असल्याने ड्रॉपलेट्सबरोबरच कोरनाबाधित व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवल्याने किंवा स्पर्श केल्यानेही तो पसरतो. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून या नर्सलाही आयोसेलेट करण्यात आलं आहे.

दोघांविरोधातही कारवाई

देशातील पॉर्नोग्राफीविरोधी कायद्यानुसार या तरुणाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नर्सला तातडीने निलंबित करण्यात आलं आहे. सध्या या दोघांविरोधात चौकशी सुरु असून त्यानंतरच त्यांना काय शिक्षा होणार हे स्पष्ट केलं जाणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील नर्स म्हणजेच रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती ही पुरुष असून हे समलैंगिक संबंधांचे प्रकरण आहे. इंडोनेशियामध्ये समलैंगिक संबंध ठेवणं हा गुन्हा असल्याने या प्रकरणासंदर्भात सोशल नेटवर्किंगवर वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nurse strips off ppe suit to have sex with covid patient in hospital toilet suspended scsg
First published on: 31-12-2020 at 08:48 IST