Old couple dance video: लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका नवरदेवाच्या आई-वडिलांचा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

एखाद्या घरात जेव्हा लग्न असतं तेव्हा सर्वात जास्त कोणाची धावपळ असेल तर ती वरमाय आणि वरबापाची असते. सर्व तयारीपासून लग्नकार्य पार पडेपर्यंत सर्व जबाबदाऱ्या यांच्या खांद्यावर असतात. मात्र या सगळ्यात जेव्हा थोडासा वेळ काढून ते कार्यक्रमात सहभागी होतात तेव्हा इतरांनाही आनंद होतो. अशाच वरमाय-वरबापाचा लग्नातील एका कार्यक्रमातला डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच. अशातच आता डान्सशिवाय लग्न पूर्ण होतच नाही.  या व्हिडीओमध्ये पाहू शकता, नवरदेवाचे आई-वडील मराठी गाण्यावर डान्स करत आहेत. “खंडेरायाच्या लग्नाला बानु नवरी नटली…” या मराठमोळ्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाहून तुम्हीही कौतुक कराल. दोघही इतके जबरदस्त नाचले आहेत की, तुमचीही नजर हटणार नाही. 

पाहा व्हिडीओ

आजकाल घरात लग्नाचं वातावरण असेल आणि डान्स होणार नाही, असं सहसा होत नाही. अनेक वेळा घरातली सून, सगळ्यांची आवडती वहिनी जेव्हा डान्स फ्लोअरवर उतरून कमरेला साडीचा पदर बांधून नाचते, तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ renuka_aatya_chwan नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.