Viral video: सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यत सगळेच अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्धीस येईल आणि कोणाची चर्चा होईल सांगता येत नाही. एका व्हिडीओमुळे अनेकजण प्रसिद्धीच्या झोतात आलेत. असाच एका आजीचा व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये एका आज्जीनं जेवणांचं ताट दिल्यानंतर जेवण करण्याआधी जे केलंय त्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही जुन्या पिढीतला आणि नव्या पिढीतला फरक कळेल. व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल, अन्नाचा असा आदर करणारी ही शेवटची पिढी..
अन्नाचा आदर करणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, खासकरून तरुणांसाठी. अन्नाचा आदर करणे म्हणजे केवळ ते वाया न घालवणे नाही, तर त्यामागे असलेली मेहनत, कष्ट आणि त्यातून मिळणारे पोषण यांचे महत्त्व ओळखणे. अन्नाचा आदर आणि कृतज्ञता म्हणजे अन्नाबद्दल आदर आणि आभार व्यक्त करणे. भारतीय संस्कृतीत अन्नाला खूप महत्त्व दिले जाते आणि त्याला देवाचा प्रसाद मानले जाते. अन्नाचा आदर करणे म्हणजे फक्त खाणेच नाही, तर त्यामागील कष्ट, मेहनत आणि संसाधनांचा आदर करणे. जुन्या पिढीतील लोक अन्नाला देव मानतात आणि त्याचा आदर करतात. त्यांच्यासाठी अन्न हेच (प्रसाद) आहे, आणि ते वाया घालवणे पाप समजले जाते.
या व्हिडीओमधूनही हेच पाहायला मिळालं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आज्जीला जेवण दिल्यानंतर सुरुवातीला आजी ताटाच्या पाया पडली आहे. त्यानंतर ताटाभोवती पाणी टाकलं ताटात आलेल्या आन्नाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि मग जेवायला सुरुवात केली.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ official_garja_maharashtra नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी प्रतिक्रिया देत असून अनेकांना त्यांच्या आजीची आठवण झाली आहे. एकानं म्हंटलंय, “या आजीला बघीतल्यावर काही क्षणां साठी असं वाटलं की ही तर माझी आजी आहे आठवण खुप येते” तर आणखी एकानं, “आजची भंगार पिढी जेवण समोर आलं की सोशल मीडियावर पोस्ट करतात… आजच्या पिढीला ना कसले संस्कार, ना चांगले वळण.. ह्याना एकच माहीत अर्धे कपडे घालून अंगप्रदर्शन करून सगळ्याना दाखवत सुटायच.. खरच जुनी पिढी परत कधीच भेटणार नाय आपल्याला.”