Old lady video viral: म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण, असं अनेकदा म्हटलं जातं. कारण या दोन्ही टप्प्यांमध्ये काही गोष्टी समान असतात. लहान मुलं जशी कुटुंबावर अवलंबून असतात, तसंच म्हातारपणी माणसं कुटुंबावर आणि विशेषतः मुला-बाळांवर अवलंबून राहतात. दोघांनाही सगळ्यांकडून प्रेम आणि आपुलकीची अपेक्षा असते.अशातच हे प्रेम जर उतरत्या काळात आईला मुलांकडून मिळालं तर तिच्याएवढं नशीबवान जगात कुणीच नसतं. अशाच एका आजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल खरंच आजी नशिबवान आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आजीबाई चक्क आपल्या नातवाच्या खेळण्यातल्या गाडीवर बसून घरात फिरत आहेत. यावेळी या आजीची मुलं अगदी लहान मुलांचं आपण कौतुक करतो तसं तिचं कौतुक करत आहेत. एकीकडे म्हातारे झाल्यावर आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारी मुलं आणि दुसरीकडे अशाप्रकारे आईला आनंद देणारी मुलं. एकीकडे आपण आपल्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करतो तर दुसरीकडे आई-वडिलांना त्रास देतो. मात्र हेच जर आपण आई-वडिलांची सेवा केली त्यांना आनंद दिला तर देव वेगळ्या शोधण्याची गरज पडणार नाही. हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहूनच तुम्हाला कळेल की, देव कशात आहे.

म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असे म्हटले जाते ते उगीच नाही. घरातील वृद्ध व्यक्ती आजाराने, व्याधीने ग्रस्त असेल, तिच्या हालचालीवर – खाण्यापिण्यावर – व्यवहारावर त्यामुळे जर मर्यादा आल्या असतील आणि त्यातून जर ती व्यक्ती अंथरुणाला खिळून असेल तर अशा परिस्थितीत घरातील वृद्धांचा स्वभाव हट्टी होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्यांना जशी औषधोपचार, शुश्रूषेची गरज असते तशी प्रेमळ स्पर्शाची, आश्वासनाचीही गरज असते. त्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालविणे, मायेचा स्पर्श, त्यांचा हात हातात घेणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हेही त्यांच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असते. ‘आपण इतरांना हवे आहोत’ ही भावना त्यांच्यासाठी मोलाची असते.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ShubhangiVirkar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.