‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. गोरगरिब, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी “शासन आपल्या दारी” च्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला जात आहे. राज्यात सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने विविध लाभ देण्यात आले असं मुख्यमंत्री सांगतात. दरम्यान याच कार्यक्रमाचं आयोजन हिंगोलीत करत असताना एक प्रकार समोर आला आहे. या कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचारी गावागावात नागरिकांना कार्यक्रमाबद्दल माहिती सांगत आहेत. येथे येण्यासाठी सांगत असताना एक आजीबाई सरकारी महिला कर्मचाऱ्यावर चांगल्याच भडक्या आहेत. या शेतकरी आजीचा रोष यावेळी पाहायला मिळाला असून याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अर्थव्यवस्थेचा कणा म्हणू शेतीकडे पाहीले जाते. मात्र ही शेती सध्या अडचणीत आहे. निसर्गाचा लहरीपणे, पाऊस वेळेवर न पडणे. वर्षभर शेतात राबून सुद्धा योग्य भाव न मिळणे यामुळे शेतकरी अडचणीत आहे. यातूनच सरकार दरवर्षी हमीभाव जाहीर करते. मात्र, तो भाव अनेकदा फक्त कागदावरच राहतो. शेतकऱ्यांना त्याची माहिती होत नाही. हमीभावासाठी घालून दिलेल्या अटींमुळे मिळेल त्या भावात त्याला शेतमाल विकावा लागतो. गरजेपोटी अनेक शेतकरी कोणाकडे तक्रारही करत नाहीत. अन्‌ तक्रार करायची तर कोठे असा प्रश्‍नही निर्माण होतो. त्यामुळेच गावात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसमोर या आज्जीबाईंनी आपली खंत व्यक्त केली.

Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती
shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शालकीय कर्मचारी महिला गावातल्या महिलांना गाडीत बसून चला असं सांगत असताना या आजीबाईंनी त्यांना कुणीही गावातलं येणार नाही असं स्पष्ट सांगितलं. तसेच शेतकऱ्यांचो चाललेले हालही आजाबीईंनी बोलून दाखवले. तसंच येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुणालाही मतदान करणार नाही, मतदान पेट्या या रिकाम्याचं पाठवणार असंही त्या बोलत आहेत. यावेळी गावकरीही आजीबाईंशी सहमत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तिनं धावत्या लोकलमध्ये प्रवाशाची कॉलर पकडली; भर गर्दीतला माय-लेकीचा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून आजीबाईंनी शेतकऱ्यांच वास्तव सगळ्यांसमोर माडलं आहे. लोकंही आजीबाईंच्या आरोपावर सहमत आहेत.तसेच नेटकरीही व्हिडीओ पाहून सरकारवर टीका करत आहे.