Old lady video viral: म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण, असं अनेकदा म्हटलं जातं. कारण या दोन्ही टप्प्यांमध्ये काही गोष्टी समान असतात. लहान मुलं जशी कुटुंबावर अवलंबून असतात, तसंच म्हातारपणी माणसं कुटुंबावर आणि विशेषतः मुला-बाळांवर अवलंबून राहतात. दोघांनाही सगळ्यांकडून प्रेम आणि आपुलकीची अपेक्षा असते.अशातच हे प्रेम जर उतरत्या काळात आईला मुलांकडून मिळालं तर तिच्याएवढं नशीबवान जगात कुणीच नसतं. मात्र उतरत्या काळात जर आपल्या मुलांनी नीट सांभाळलं नाही तर काय अवस्था होते पालकांची हे दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रेल्वे स्टेशनवर बसलेल्या आईची अवस्था पाहून तुम्हीही म्हणाल, अशी वेळ येत असेल तर वंशाला दिवे हवतेच कशाला.अलीकडच्या काळात काही मुले आणि मुली वृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत. मात्र, त्यांची संपत्ती घेऊन त्यांना एकटे सोडून देताता. याच आई वडिलांचा मुलगा हवा वंशाला दिवा हवा अट्टाहास होता एकेकाळी आणि आज हाच वंशाचा दिवा जर असे दिवस दाखवणार असेल तर वंशाचा दिवा हवाच कशाला?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक म्हातारी आई रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवर बसून लोकांंकडे हात पसरत बसली आहे. एवढ्या गर्दीत ती प्रत्येकाकडे हात पसरत भिक मागत आहे, कुणीतरी काहीतरी देईल या आशावर ती बसलेली दिसत आहे. या वयात आईचे हे हाल होताना पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी येईल, मात्र ही मायानगरी आहे इथे कुणालाच थांबायला वेळ नाही असं दिसत आहे. अशातच एक तरुण हे सगळं पाहतो आणि आईसाठी फळं घेऊन येतो. यावेळी आईच्याही चेहऱ्यावर आनंद आल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ abhijeetsawant_333 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एकानं म्हंटलंय, “दिवाच नाही पणती सुधा जबाबदार आहे,कारण पालन पोषण तर दोघांचे सारखेच केलेले असते” तर आणखी एकानं, “आईं स्वामी तिन्ही जगाचा”आई”विना भिकारी” अशी प्रतिक्रिया दिली आहे.