करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे गुरुवारी जणू कबूल केले. मात्र या बैठकीमध्ये निर्मला यांनी ‘देवाची करणी’ म्हणजेच Act of God चा उल्लेख केल्यानंतर गुगलपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत यासंदर्भातील सर्चचे प्रमाण वाढल्याचे दिसले. ट्विटर आणि फेसबुकवरही याचसंदर्भातील चर्चा सुरु होत्या. मात्र ट्विटवर महाराष्ट्रातील एका भाजपा नेत्याचे ट्विटही चांगलेच व्हायरल झालं आहे.  विशेष म्हणजे हे ट्विट पंतप्रधान मोदी हे दैवी अवतार असल्याचा दावा करणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे प्रकार?

गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्यांचे उत्पन्न घटले असून त्यांनी केंद्राकडे जीएसटीच्या नुकसानभरपाईचा धोशा लावला आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांची १.५ लाख कोटींची नुकसानभरपाई केंद्राने दिलेली नाही. राज्यांना दिल्या जाणाऱ्या जीएसटी नुकसानभरपाईचा प्रश्न सोडवण्यासाठी गुरुवारी सलग पाच तास जीएसटी परिषदेत चर्चा झाली. या बैठकीमध्ये सीतारामन यांनी देशावर आलेले करोना संकट हे  ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असं म्हटलं. म्हणजेच देशातील आर्थिक परिस्थितीसाठी कोणालाही थेट जबाबदार धरता येणार नसून निसर्गनिर्मिती गोष्टींमुळे हे आर्थिक संकट ओढावल्याचे निर्मला यांना सुचित करायचं होतं.

नक्की वाचा >> Act of God म्हणजे काय?, GST परिषदेनंतर सारा देश शोधतोय अर्थ, महाराष्ट्र यादीत अव्वल

ते ट्विट आलं चर्चेत

निर्मला यांच्या या व्यक्तव्यानंतर सोशल मिडियावर Act of God बद्दल चांगलीच चर्चा रंगली. यामध्येच अनेकांनी केंद्र सरकार आता थेट देवाला आर्थिक परिस्थितीसाठी दोष देत असल्याची टीका केली. तर काहींनी महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी २०१८ साली १२ ऑक्टोबर रोजी केलेल्या ट्विटचा संदर्भ दिला. या ट्विटमध्ये वाघ यांनी, “भारताचे पंतप्रधान परम आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी हे श्री विष्णु चे अकरावे अवतार आहेत,” असं म्हटलं होतं. त्यांनी मराठीबरोबरच हिंदीतही मोदींनी टॅग करुन ट्विट केलं होतं.

 

आता याच ट्विटचा आधार घेत देशातील अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीसाठी देव जबाबदार आहे असं अर्थमंत्री म्हणतायत आणि दुसरीकडे भाजपाच्या नेत्यानेच मोदींना देव म्हटलं होतं म्हणजेच नक्की जबाबदार कोण असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वाघ यांच्या जुन्या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट आता व्हायरल होत आहेत. अनेकांनी या ट्विटचा संदर्भ देत मोदींना अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीसाठी जबाबदार धरावे का असा प्रश्न विचारला आहे.

नक्की वाचा >> मोदी सरकारसमोर अर्थसंकट गडद; GDP च्या तुलनेत सरकारी कर्जाचा आकडा ९१ टक्क्यांवर जाणार

 

नक्की वाचा >> केंद्र सरकार HAL मधील हिस्सा विकण्याच्या तयारीत; प्रक्रियेला सुरूवात

Act of God चा अर्थ काय?

Act of God ही टर्म प्रामुख्याने विम्यासंदर्भात वापरली जाते. तसेच कायदेशीर बाबींमध्येही ही वापरली जाते. ढोबळपणे या टर्मचा अर्थ सांगायाचा झाल्यास एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेसाठी कोणालाच जबाबदार धरता येत नाही. ती घटना घडून जाणे हे निर्सगामुळे होतं आणि त्याला कोणीच काही करु शकत नाही असं सांगण्यासाठी Act of God चा वापर करतात. याचवरुन बॉलिवूडमध्येही ओ माय गॉड नावाचा अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old tweet saying pm modi is 11th avatar of lord vishnu goes viral after act of god comment by nirmala sitharaman scsg
First published on: 28-08-2020 at 08:42 IST