India Pakistan Conflict Fact Check : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारत-पाकिस्तानमधील तणावादरम्यान एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचा आढळून आला, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की, भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या अणु कमांड सेंटरजवळ पडले, ज्यामुळे वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली. यात असाही दावा करण्यात आला की, या हल्ल्यामुळे इस्लामाबाद हादरले आहे. पण, खरंच अशी कोणती घटना घडली का? तसेच व्हायरल व्हिडीओमागील नेमकं सत्य काय आहे, जाणून घेऊ….
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर PIXEL PROPHET ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजरदेखील समान दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास :
व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.
आम्हाला ६ मे रोजी पोस्ट केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये कीफ्रेममधील फोटो आढळले.

कॅप्शनमध्ये असे सुचवण्यात आले होते की, “राजधानीतील #صنعاء पॉवर प्लांटवर इस्रायली आक्रमणाला लक्ष्य करण्याचा गुन्हा #ذهبان
جرائمامريكاواسرائيل #फोटो | राजधानी, #सना’मधील #धहबान पॉवर स्टेशनला लक्ष्य करण्याचा #इस्रायली आक्रमकतेचा गुन्हा. #अमेरिकाआणिइस्रायली_गुन्हे”
रॉयटर्सने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये व्हायरल व्हिडीओतील काही कीफ्रेम आम्हाला आढळल्या.

या अहवालात म्हटले आहे की : हुथीसंचालित अल-मसिरा टीव्हीवरील व्हिडीओ आणि रॉयटर्सने पोस्ट केलेला व्हिडीओ मंगळवारी (६ मे) येमेनच्या मुख्य विमानतळावर आणि साना येथील एका वीज केंद्रावर झालेल्या विनाशाचे दर्शन घडवतो. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, त्यांनी मंगळवारी येमेनच्या मुख्य विमानतळावर हवाई हल्ला केला, इस्रायल आणि इराण-संलग्न हुथी बंडखोरांमधील तणाव वाढल्यानंतर दोन दिवसांत झालेला हा दुसरा हल्ला आहे.
आम्हाला ६ मे रोजी @TvAlmasirah या X अकाउंटने पोस्ट केलेली तीच दृश्येदेखील आढळली.
बीबीसीनेही याबद्दल एक वृत्त प्रकाशित केले होते.
आम्हाला सहा दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या YEMEN TODAY च्या एका बातमीतही असेच दृश्य आढळले.
निष्कर्ष : येमेनच्या मुख्य विमानतळावर आणि साना येथील एका वीज केंद्रावर झालेल्या विनाशाचा व्हिडीओ अलीकडील भारत-पाकिस्तानातील तणावादरम्यानचा असल्याचा खोटा दावा करत शेअर केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.