सगळीकडे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी देवीची घटस्थापना करून नऊ दिवस देवीची मनोभावे आरती केली जाते आणि भजनसुद्धा म्हटले जाते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोचा आहे. दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेचा विषय ठरत असतो. पण, आज दिल्ली मेट्रोतील व्हिडीओ पाहून तुमचा संताप होणार नाही; तर तुम्ही कौतुकाने टाळ्या वाजवणार एवढं नक्की…

व्हायरल व्हिडीओ दिल्ली मेट्रोतील आहे. मेट्रोत तरुणांचा ग्रुप भजन गाताना दिसतो आहे. दोन तरुण मेट्रोत सीटवर बसले आहेत, तर त्यातील एक तरुण हातात गिटार घेऊन वाजवताना दिसत आहे. गिटार वाद्याच्या तालावर नवरात्रीसाठी खास भजन तरुण मंडळींनी सादर केलं आहे. “तुने मुझे बुलाया शेरा वालीये” हे खास भजन एक तरुण गाण्यास सुरुवात करतो आणि मेट्रोतील इतर प्रवासी आणि तरुणाचे मित्र त्याला भजन गाताना साथ देत आहेत. तसेच मेट्रोतील प्रवासी त्या गाण्याचे बोल गुणगुणताना दिसत आहेत. ‘नवरात्रीनिमित्त मेट्रोत कशाप्रकारे तरुणांनी मिळून भजन सादर केलं एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा…‘डिलिव्हरी गर्ल’चा Video झाला व्हायरल ! झोमॅटोच्या सीईओने दिली पहिली प्रतिक्रिया…

व्हिडीओ नक्की बघा :

नवरात्रीनिमित्त मेट्रोत खास भजन :

“तुने मुझे बुलाया शेरा वालीये” हे भजन स्वर्गीय नरेंद्र चंचलजी यांनी गायलं आहे, तर नवरात्रीनिमित्त तरुण मंडळींनी हे भजन मेट्रोत सादर केलं आहे. भजन ऐकून मेट्रोतील सर्व प्रवासी मंत्रमुग्ध झाले आहेत आणि भजनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. तसेच काही जण त्यांच्या मोबाईलमध्ये भजनाचा व्हिडीओ शूट करताना दिसून आले आहेत, तर अनेक जण तरुणाला भजन गाताना टाळ्या वाजवत साथ देत आहेत. याआधीसुद्धा या तरुण मंडळींनी मेट्रोत प्रसिद्ध हिंदी गाण्याचे सादरीकरण केलं होत. तर आज त्यांनी भजन सादर करून अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मिडीयावर हा व्हिडीओ @arjunbowmick या युजरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “चलो बुलावा आया है माता ने बुलाया है” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच व्हिडीओ पाहून नेटकरी, ‘दिल्ली मेट्रोचा आतापर्यंतचा सगळ्यात चांगला व्हिडीओ’, ‘जय माता दी’ अशा अनेक कमेंट करताना दिसत आहेत. तसेच तरुणांच्या आवाजाने अनेक लोकांचे मन जिंकले आहे, असे काही जण कमेंटमध्ये नमूद करताना दिसले आहेत.