आजवर स्थापत्यशात्राचे विविध प्रयोग पाहिले असतील. असाच एक स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमूना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये साकारण्यात आला आहे. अंत्यत विशाल आणि लग्झरिअस अशा एका हॉटेलचं उद्घाटन गुरूवारी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे हे हॉटेल एका इलेक्ट्रीक गिटारच्या आकारात साकारण्यात आलं आहे. या हॉटेलमध्ये तब्बल ७ हजारांची आसनक्षमता असलेला कसिनो फ्लोअर, १ हजार २०० खोल्या, अनेक गेमिंग टेबल आणि म्युझिक कॉन्सर्टचे अनेक स्टेजदेखील आहेत.
गुरूवारी या अनोख्या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं. जॉनी डेप, मोर्गन फ्रीमन, सोफी रिची अशा दिग्गज हॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीत या हॉटेलचं उद्घाटन झालं. अमेरिकेतील सॅमिनॉल ट्राइबच्या श्रीमंतांनी हे हॉटेल उभारलं आहे. दक्षिण फ्लोरिडामध्ये सॅमिनॉल ट्राइबचे जवळपास ४ हजार २०० लोक राहत आहेत. १९७९ मध्ये ‘हाय स्टेक्स बिंगो हॉल’ची उभारणी झाली होती तेव्हापासून त्यांनी गेमिंग कसिनोमध्ये पाऊल ठेवलं होतं. कसिनोच या हॉटेलमधील मुख्य आकर्षण असल्याचं हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
जगातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या तलावाच्या मध्यभागी हे हॉटेल उभारण्यात आलं आहे. दरम्यान, या ठिकाणी येणाऱ्या लोकांना स्पा सारख्या सुविधांचाही लाभ घेता येणार आहे. दरम्यान, हे हॉटेल म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग असल्याचं मत हॉटेल व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आलं आहे. या हॉटेलच्या उभारणीसाठी तब्बल दीड लाख कोटी रूपयांचा खर्च आला आहे.