One plus 15 : वनप्लसने नेहमीच भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत आपल्या शक्तिशाली वैशिष्ट्यांसह आणि उत्कृष्ट कामगिरीने स्वतःचे नाव कमावले आहे. हीच परंपरा पुढे चालू ठेवत, कंपनीने आता भारतीय बाजारात आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन, वनप्लस १५ लाँच केला आहे.
प्रगत क्वालकॉम प्रोसेसर, मोठी बॅटरी, जलद चार्जिंग आणि अत्याधुनिक डिस्प्ले तंत्रज्ञानासह हा फोन तंत्रज्ञानप्रेमींसाठी एक मोठे आकर्षण ठरणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी लाँच झालेला हा मॉडेल वनप्लस १३ चा उत्तराधिकारी असून डिझाईन आणि परफॉर्मन्स दोन्हीमध्ये सुधारणा घेऊन आला आहे.
वनप्लस १५ : शक्तिशाली वैशिष्ट्यांसह भारतात अधिकृत लाँच
वनप्लसने गुरुवारी १३ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतात आपला नवा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस १५ लाँच केला आहे. कंपनीने या नवीन मॉडेलमध्ये अत्याधुनिक हार्डवेअर वापरून परफॉर्मन्स आणि युझर एक्स्पीरियन्स दोन्ही सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. हा स्मार्टफोन वनप्लस १३ चा उत्तराधिकारी असून, त्यापेक्षा अधिक शक्तिशाली प्रोसेसर आणि मोठी बॅटरी यांसह येतो. कंपनीचा प्लस माइंड फीचर यामध्ये कायम ठेवण्यात आला असून, संपूर्ण अनुभव अधिक स्मूथ करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्येही नवीनता आणली आहे.
डिस्प्ले : 165 Hz रिफ्रेश रेटसह ProXDR स्क्रीन
वनप्लस १५ मध्ये 6.78-इंच LTPO 1.5K ProXDR डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 165 Hz पर्यंत अॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट मिळतो, ज्यामुळे स्क्रोलिंग, गेमिंग आणि मल्टीटास्किंग अधिक स्मूथ होते. स्क्रीनची कमाल ब्राइटनेस १,८०० निट्स आहे, त्यामुळे तेजस्वी सूर्यप्रकाशातही डिस्प्ले सहज दिसतो. व्हिडीओ पाहणे, गेमिंग आणि फोटो एडिटिंग यासाठी हा डिस्प्ले प्रीमियम व्हिज्युअल क्वालिटी देतो.
स्नॅपड्रॅगन ८ एलिट जनरल ५ प्रोसेसर
या स्मार्टफोनमध्ये नवीन पिढीचा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ प्रोसेसर आहे. हा चिपसेट जलद प्रक्रिया, अधिक कार्यक्षम मल्टीटास्किंग आणि उच्चस्तरीय गेमिंग अनुभव देतो. फोनमध्ये 16 GB पर्यंत RAM आणि 512 GB स्टोरेज उपलब्ध असून, हे कॉम्बिनेशन फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये अत्यंत ताकदवान मानले जाते. वनप्लस १५ मध्ये OxygenOS 16 (Android 16) हे अगदी नवीन पद्धतीने दिले आहे.

वनप्लस १५ मध्ये तिहेरी 50MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 50MP मेन कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 50MP टेलिफोटो लेन्स समाविष्ट आहेत. या सेटअपमुळे फोटोमध्ये अधिक तपशील, कमी नॉइज आणि नैसर्गिक रंग मिळतात. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला असून तो पोर्ट्रेट आणि व्हिडीओ मोडमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो.
फोनमध्ये ७,३०० mAh ची मोठी बॅटरी असून 120W SuperVOOC चार्जिंगसह येतो. तसेच, 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टही दिला आहे. डिझाइनच्या बाबतीत वनप्लस १५ इंफिनिटे ब्लॅक रंगात फ्रॉस्टेड ग्लास आणि मॅट फिनिशसह येतो, तर सेंड स्टोर्म आणि अल्ट्रा वॉयलेट असे दोन अतिरिक्त रंग पर्याय उपलब्ध आहेत.
भारतात हा फोन रु ७२,999 (12GB/256GB) आणि रु ७९,९९९ (16GB/512GB) या दोन व्हेरिएंट्समध्ये मिळेल. विक्री आज रात्री ८ वाजल्यापासून सुरू होणार असून वनप्लस स्टोरेस, वनप्लस वेबसाइट, ॲमेझॉन तसेच रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स, बजाज इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर ऑफलाइन पार्टनर्सकडे उपलब्ध असेल.
