OnePlus Nord 5 and Nord CE 5 Launch In India : लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड वनप्लसने आपल्या सीरिजमध्ये तीन नव्या उपकरणांचा समावेश केला आहे. हे तीन डिव्हाईस म्हणजे Nord 5, Nord CE 5 व Buds 4 आहेत. तर या प्रत्येक डिव्हाइसची किंमत, त्याचे फीचर्स त्याचे स्पेसिफिकेशन काय असणार त्याबद्दल सविस्तर बातमीतून जाणून घेऊ…

वनप्लस नॉर्ड ५ मध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 चिपसेट आहे, ज्यामध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ gigabytes स्टोरेज आहेत; ज्यामध्ये 144 Hz सपोर्टसह 6.83-इंचांचा फूल HD AMOLED पॅनेल आहे. ऑप्टिक्ससाठी ५० मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड शूटर आहे. मेन कॅमेरा 60 fps वर 4K व्हिडीओ आणि फ्रंट-फेसिंग कॅमेरा ५० मेगापिक्सेलचे युनिट आहे; जो 60 fps वर 4K व्हिडीओदेखील रेकॉर्ड करू शकतो. त्याशिवाय फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, NFC आणि ब्ल्यूटूथ ५.४ आहे. फोनमध्ये 80W SuperVOOC चार्जिंगसह 6,800 mAh बॅटरी युनिट आहे.

आता यापेक्षा अधिक परवडणाऱ्या पर्यायाकडे जाऊया… म्हणजे Nord CE 5 बद्दल जाणून घेऊया… MediaTek Dimensity 8350 चिपसेट, १२ जीबी रॅम व २५६ जीबीपर्यंत स्टोरेज आहे. बॅटरीसाठी त्यात ८० वॉट सुपर VOOC चार्जिंग सपोर्टसह एक मोठे 7100 mAh युनिट आहे. फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह ६. ७७ इंचांचा AMOLED पॅनेल आहे. ऑप्टिक्ससाठी यात ५० मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा, ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड शूटर आणि १६ मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा व ब्ल्यूटूथ ५.४ आहे.

वनप्लस नॉर्ड ५, वनप्लस नॉर्ड सीई ५ आणि वनप्लस बड्स ४ किंमत (OnePlus Nord 5, Nord CE 5 And Buds 4 Launched)

वनप्लस नॉर्डची सुरुवातीची किंमत ३१ हजार ९९९ पासून सुरू होते. पण, तो तुम्हाला २९ हजार ९९९ रुपयांना मिळेल. तसेच १२ जीबी रॅम असलेला टॉप-एंड ५१२ जीबी व्हेरिएंट ३५ हजार ९९९ रुपयांच्या किमतीत उपलब्ध असेल. हा फोन मार्बल सँड्स, फॅंटम ग्रे व ड्राय आइस या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहकांना निवडक बँक क्रेडिट कार्डवर दोन हजारांची त्वरित सूट आणि सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI मिळू शकतो.

नॉर्ड सीई ५ बद्दल बोलायचे झाले, तर तो ८ जीबी + २५६ जीबी मॉडेलसाठी २४ हजार ९९९ रुपये जो तुम्हाला २२ हजार ९९९ रुपयांना मिळेल. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या टॉप-एंड मॉडेलची किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे; जो नेक्सस ब्ल्यू, ब्लॅक इन्फिनिटी व मार्बल मिस्ट या तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. वनप्लस बड्स ४ तुम्हाला पाच हजार ४९९ च्या कमी किमतीत उपलब्ध असेल, ज्याची मूळ किंमत सहा हजार रुपये असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
OnePlus Nord 5 Nord CE 5 Buds 4 Launched
(फोटो सौजन्य: @Google Trends)

नॉर्ड ५ आज ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. नॉर्ड सीई ५ तुम्हाला १२ जुलै रोजी सकाळी १२ वाजता विक्रीसाठी उपलब्ध होईल. वनप्लस इअरबड्स ४ आज ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता उपलब्ध होईल. वनप्लस इंडिया वेबसाइट, वनप्लस स्टोअर अॅप, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि वनप्लस एक्सपिरीयन्स स्टोअर्स, रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स व बजाज इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या इतर स्टोअरमध्ये उपलब्ध असतील.