Can You Find The Hidden Dog In This Image: कधी कधी एखादे छोटेस कोडे देखील रंजक असू शकते. कोडे सोडवण्याचे चॅलेंज फार मजेशीर असू शकते. जर तुम्हीही हे कोडे सोडवण्यात पटाईत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक असे कोडे घेऊन आलो आहोत, ज्याचे उत्तर शोधताना तुम्हाला मजा येईल. सध्या एक फोटो व्हायरल होत आहेत ज्यात एका खोलीमधील पसरा दिसत आहे. पण पसऱ्यामध्ये एक कुत्रा लपला आहे.

१० सेकंदात लपलेला कुत्रा शोधून दाखवा

Reddit वर शेअर केलेला फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की खोलीमध्ये सर्वत्र पसारा आहे. सामान इकडे तिकडे विखूरलेले आहे. जमिनीवर सामान पडले आहे. पलंगावरील चादर देखील घडी घातलेली नाही आणि इतर गोष्टी पूर्णपणे दुरवस्थेत आहेत. तर चॅलेज की तुम्हाला त्यातून लपलेला कुत्रा शोधून काढायचा आहे. तुम्ही तुमच्या बुद्धीचा कस लावा आणि आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी लपलेला कुत्रा शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला मदत करू.

Optical illusion : गडद अंधार असलेला हा रस्ता नक्की बोगदा आहे की जंगल? पाहा निसर्गाची कमाल

I was frantically looking for my dog for 10 minutes.
byu/shetarp429 inaww

सोशल मीडियावर ही पोस्ट काही वर्षांपूर्वी शेअर केली गेली होती, पण पुन्हा एकदा हे चॅलेंज इंटरनेटवर व्हायरल होत आहे. आता ही पोस्ट २१ हजारपेक्षा जास्त लोक पाहत आहेत आणि सतत लोक या पोस्टवर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘ओह गोंडस, छोटसं नाक.’ तो दुसर्‍याने लिहिले की, मुदाम लपाछपीचा खेळ खेळतो आहे का? तिसऱ्याने लिहले की, ”माझी कारगी पण असेच करते” आणखी एकाने लिहिले की, ‘मी १० मिनिटांपासून कुत्रा शोधण्याचा प्रयत्न करतोय पण काहीच सापडत नाही.

हेही वाचा – पुंगीच्या तालावर नव्हे, चक्क रॉक म्युझिकवर नाचतो हा साप; Viral Videoपाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!

तुम्ही शोधत असलेला कुत्रा बेडवरील चादरीखाली लपला आहे. पाहताक्षणी तुम्हाला तो दिसणार नाही पण जर नीट पाहिलं तर फोटो तुम्हाला चादरीमध्ये कुत्र्याचं नाक दिसेल.