Optical Illusions : ऑप्टिकल इल्यूजन हा बौद्धिक क्षमता जाणून घेणारा खेळ आहे. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही इल्यूजन इतके कठीण असतात की सोडविणे अशक्य असते. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटो पाहून संभ्रमित व्हाल.
या व्हायरल फोटोमध्ये हे हिरवेगार झाड दिसत आहे. या झाडाला असंख्य फांद्या आहेत आणि हिरवी पाने दिसत आहे.हिरव्या पानांमुळे झाडांचा रंग पूर्णपणे हिरवा दिसत आहे पण आम्ही जर तुम्हाला सांगितले की झाडावर दिसत असलेली हिरवी पाने नाही तर.. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन
या व्हायरल ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक झाड दिसेल. या झाडाला असंख्य फांद्या आणि हिरवी पाने दिसतील.रात्रीच्या अंधारात काढलेल्या हा झाडाचा फोटो तुमचे अधिक लक्ष वेधून घेईल. या फोटोवर कॅप्शन लिहिलेय, “ही पाने नाहीत, नीट पाहा”
हेही वाचा : भारतीय सैनिकाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल
खरंच झाडाला पाने नाहीत?
सुरुवातीला तुम्हाला हिरवी पाने असलेले झाड दिसेल पण नंतर तुम्ही नीट लक्ष द्याल तर तुम्हाला कदाचित पानांऐवजी वेगळं काही दिसू शकते. हो, हे खरंय. झाडाला पाने लागलेली नसून झाडावर असंख्य पोपट बसलेले आहेत. पोपटांचा रंग आणि पानांचा रंग एकच असल्याने पाने आणि पोपटांमधील फरक लवकर कळत नाही. हा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Roop Darak या ट्विटर अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खूप सुंदर”