Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन हा असा खेळ आहे की, ज्यामुळे व्यक्तीची बौद्धिक क्षमता लगेच ओळखता येते. काही ऑप्टिकल इल्युजन इतकी कठीण असतात की, ती सोडवणे अशक्य असतात.
सध्या असाच संभ्रमित करणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोन कासव दिसत आहेत. हा फोटो जितका दिसतो तितका सोपा नाही. या फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनीचा चेहरा लपलाय आणि आपल्याला तो चेहरा शोधून काढायचाय.

व्हायरल फोटो

हा व्हायरल फोटो एखाद्या निसर्गरम्य परिसरातील आहे. या फोटोमध्ये दोन कासव दिसत आहेत. एका कासवाच्या वरती दुसरे कासव बसलेले दिसत आहे. फोटोमध्ये कुठेही महेंद्रसिंग धोनीचा चेहरा दिसत नाही.

हेही वाचा : याला म्हणतात जुगाड! तरुणाने बनवली चक्क पाण्यावर चालणारी सायकल, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

खरेच या फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनीचा चेहरा लपलाय?

या व्हायरल ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये सुरुवातीला दोन कासवांशिवाय काहीही दिसत नाही; पण नंतर तुम्ही नीट निरीक्षण कराल, तर तुम्हाला कदाचित महेंद्रसिंग धोनीचा चेहरा दिसू शकतो. सुरुवातीला तुम्हाला फक्त चेहरा दिसेल; पण जर तुम्ही एक डोळा बंद करून फोटोला एका बाजूने नीट पाहाल, तर तुम्हाला स्पष्टपणे लांब केस असणारा महेंद्रसिंग धोनी दिसू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Priyaanka या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला धोनीचा चेहरा दिसला. खूप सुंदर फोटो आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर.. मी धोनीचा खूप मोठा चाहता आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “धोनीच्या चाहत्यांसाठी काहीही अशक्य नाही.”