काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत. आज आपण अशाच एका ऑप्टिकल इल्यूजनविषयी जाणून घेणार आहोत. ज्याचे खरे उत्तर आजवर माहिती नाही. ऑप्टिकल इल्यूजन सोडविणे अनेकांना आवडते. काही इल्यूजन इतकी कठीण असतात की सोडविणे गुंतागुंतीचे होऊन जाते. असेच एक हत्तीचे चित्र असलेले इल्यूजन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या चित्रात हत्तीला नेमके किती पाय आहेत? हे सांगायचे आहे.

चित्र पाहून तुम्हाला वाटेल हे खूप सोपे इल्यूजन आहे पण जेव्हा तुम्ही हत्तीचे पाय मोजणार तेव्हा तुम्हालाच कळणार नाही की हत्तीला नेमके किती पाय आहेत? संभ्रमित करणारे हे इल्यूजन सध्या खूप चर्चेत आहे.

हेही वाचा : Optical Illusion : फोटोमधील कोणता आकडा आहे गायब? वाटतं तितकं सोपं नाही, एकदा क्लिक करून पाहाच

चित्र बनविणाऱ्या व्यक्तीने अत्यंत हुशारीने हत्तीचे चित्र रेखाटले आहे. या चित्रात तुम्हाला हत्तीचा एकच पाय नीट दिसत आहे. बाकीचे पाय मात्र नीट दिसत नाहीत. जर तुम्ही जवळून बघाल तर तुम्हाला दिसेल की चित्रकाराने हत्तीचे बाकी पाय नीट रेखाटले नाहीत आणि पायाच्या सावलींना पायांमध्ये रेखाटले आहे. त्यामुळे चित्र पाहून कोणीही संभ्रमित होईल.

हेही वाचा : Optical Illusion : खरे प्रतिबिंब कोणते? डोळे चोळूनही ओळखू शकणार नाही, एकदा क्लिक करून बघा

@MartinaRosemann या ट्विटर अकाऊंटवरून या चित्राचा फोटो शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये हत्तीला किती पाय आहेत, विचारले आहे. या फोटोवर काही युजर्सनी चार तर काही युजर्सनी पाच पाय असल्याचे सांगितले आहे. एका युजरने हत्तीला आठ पाय असल्याचे लिहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या हे इल्यूजन सोशल मीडयावर व्हायरल होत आहे. चित्रकाराने हूशारीने हत्तीला रेखाटले आहे, त्यामुळे हत्तीला नेमके किती पाय आहेत, हे सांगता येत नाही.