Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या फोटोत एक पत्याचे कार्ड दिसत आहे. ज्यामध्ये दोन आठ नंबर दिसत आहेत. मात्र यात अजून एक आठ नंबर लपलाय जो तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.
तुम्हाला कार्डवर तिसरा ८ दिसला का?
तुम्ही पत्ते खेळत असाल तर तुम्हाला माहीत असेल की, या पत्यांवर एक ते दहा पर्यंत संख्या असतात आणि चार प्रकारचे क्लब असतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो रेड डायमंडचा आठवा क्रमांक असलेल्या पत्याचा आहे. आता लोकांसमोर आव्हान आहे की चित्रात दोन आठ नंबर दिले आहेत पण आता तिसरा आठवा नंबर शोधून दाखवायचा आहे. मात्र, ते शोधण्यासाठी तुम्हाला केवळ ७ सेकंदांचे आव्हान देण्यात आले आहे. पत्त्यावर फक्त दोन 8 आहेत असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाहीये. पत्त्यावर तिसरा नंबर 8 देखील दाखवण्यात आला आहे. तो ओळखण्याचा प्रयत्न करा.

तिसरा ८ नंबर शोधण्यासाठी ७ सेकंदांचे आव्हान स्वीकारा
कार्डच्या वरच्या डाव्या आणि खालच्या उजव्या कोपऱ्यात ८ क्रमांक दोनदा दिसतोय. आता तिसरा क्रमांक शोधण्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक या कार्डकडे पाहावे लागेल. तुम्ही लाल डायमंडच्या आकाराकडे बारकाईने पाहिल्यास, तर आतमध्ये मध्यभागी तुम्हाला एक ८ आकार दिसेल. ब्रिटनची गॉट टॅलेंट स्पर्धक जेमी रेवेनने ट्विटरवर ही आश्चर्यकारक युक्ती पोस्ट केली आहे. डायमंड कार्ड ८ च्या मध्यभागी आणखी ८ आकार तयार केला जातो, मात्र यासाठी आपल्याला काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. हा एक जुना भ्रम असून हे ट्विट २०१८ मध्ये करण्यात आले होते.
( हे ही वाचा: चित्रात मावळणाऱ्या सुर्यामध्ये लपून बसलाय एक जिराफ; समोर असूनही अनेकांना दिसला नाही)
