ऑप्टिकल इल्युजनचे फोटो सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल होत असतात. ते जरी आपल्याला गोंधळात पडत असले, तरीही आपल्या मेंदूच्या पेशींच्या व्यायामासाठी हे अतिशय चांगले आहे. मानवी मेंदूला विविध उत्तेजकतेचे आकलन कसे होते याचे विश्लेषण करण्यात ते मदत करते. विज्ञान अभ्यास दर्शविते की मानवी मेंदू वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी पाहू शकतो.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे ऑप्टिकल इल्युजनचे चित्र पाहा. या चित्रात, घुबडासारख्या दिसणाऱ्या अनेक बाहुल्यांसह एक खरे घुबडही बसलेले आहे. आता अवघ्या ५ सेकंदात घुबड शोधण्याचे आव्हान लोकांसमोर आहे. जर तुम्हाला ५ सेकंदात खरे घुबड दिसले तर तुम्ही जिनिअस सिद्ध व्हाल.

या चित्रात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबेरंगी घुबडांच्या बाहुल्या एका रॅकमध्ये मांडलेल्या पाहू शकतो. मात्र, या घुबडांच्या बाहुल्यांमध्ये खराखुरा घुबडही बसला आहे आणि कमीत कमी वेळात खरे घुबड शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. खेळण्यांमध्ये असलेले खरे घुबड अवघ्या ५ सेकंदात शोधायचे आहे. तुम्ही यातील खरा घुबड शोधू शकता का?

Viral Video : ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात क्रेनही पडली नदीत; धक्कादायक अपघात कॅमेरात कैद

जर तुम्हाला खरे घुबड सापडले नसेल तर पुन्हा एकदा हे चित्र नीट पहा, तुम्हाला घुबड नक्की सापडेल. ज्यांनी हे घुबड ५ सेकंदांच्या आत शोधले, त्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण आहे. ते खऱ्या अर्थाने जिनिअस आहेत. मात्र जर अजूनही तुम्हाला या बाहुल्यांमध्ये लपलेला खरा घुबड सापडत नसेल तर काही हरकत नाही. खाली दिलेल्या चित्रात हा घुबड कुठे आहे ते आपण पाहू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
optical illusion viral photo
Photo : Social Media

या फ्लफ बॉल जातीच्या घुबडाचा उगम वेस्ट लोथियन येथील स्कॉटिश घुबड केंद्रात झाला आणि तिथल्या अभ्यागतांमुळे तो लोकप्रिय झाला. कोणीतरी केंद्रात जाऊन त्याचा फोटो क्लिक केला आणि आता हा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.