सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही महत्वाचा संदेश देणाऱ्या अशा गोष्टींचा यात समावेश असतो. यातीलच एक रंजक प्रकार म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युजन हा आता बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यामध्ये असणारी कोडी सोडवणे, व्यक्तीमत्वाबद्दल काही विशेष संकेत ओळखणे हे काही जणांना तणाव घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असेच ऑप्टिकल इल्युजनचे एक चित्र सध्या व्हायरल होत आहे. काय आहे यामधलं चॅलेंज जाणून घ्या.
हे चित्र अनेक चित्रांना एकत्र करून बनवलेल दिसत आहे. या गुंतागुंतीच्या चित्रामधून एक चॅलेंज दिले जात आहे. या चित्रामध्ये एकुण किती प्राणी आहेत हे ओळखण्याचे हे चॅलेंज आहे. हा फोटो पाहून तुम्हाला एकुण किती प्राणी आहेत ओळखता येतय का पाहा.
फोटो :

या फोटोमध्ये एकुण ११ प्राणी आहेत. ओळखता आले नसतील तर दुसऱ्या फोटोमधून तुम्हाला कोणते ११ प्राणी आहेत हे स्पष्ट होईल.

आणखी वाचा : “भटक्या कुत्र्यांना जीव…”; अभिनेता सोनू सूदचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
हा फोटो तुमच्या मित्रांना दाखवून त्यांना ११ प्राणी शोधण्याचे चॅलेंज देऊ शकता.