ऑप्टिकल इल्यूजन ही एक प्रकारची बौद्धीक चाचणी असते. अनेकदा ऑप्टिकल इल्यूजन सोडविणे, खूप अवघड असते. सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो चर्चेत आहे.या फोटोमध्ये ससा दिसत आहे पण ऑप्टिकल इल्यूजननुसार यामध्ये एक बदकदेखील लपलेला आहे. सध्या हा फोटो व्हायरल होत आहे. हेही वाचा : आईचं प्रेम पाहून व्हाल भावुक! बससाठी पैसे नसताना मुलीला भेटायला ‘अशी’ गेली दिव्यांग महिला; १७० किमी केला एकटीने प्रवास या व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमध्ये बसलेला सशाचे चित्र दिसत आहे.. सशाचा फोटो हा आडवा आहे. opticalillusionss या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर लिहिले आहे, तुम्हाला ससा दिसतो की बदक? आणि पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की तुम्हाला आधी काय दिसले? हेही वाचा : OMG! “पापा की परी उड़ चली थी”, Video पाहून तुमच्याही अंगावरही येईल काटा https://www.instagram.com/p/CWcd4QFMzYN/?utm_source=ig_embed&ig_rid=3061fc4e-25d0-4799-a3d8-9ee9ee6dd5fb या पोस्टवर अनेक यूजर्सनी कमेंट करत त्यांना फोटोमध्ये ससाच दिसत असल्याचे लिहिले आहे तर काही यूजर्सनी ससा आणि बदक दोन्ही दिसल्याचे लिहिले आहे. एक यूजर लिहितो, "बदकाचे तोंड दिसले पण शरीर सशाचे आहे." तर अन्य यूजर लिहितो, "बदकाला शोधणे खूप कठिण आहे" सध्या हा व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनमध्ये तुम्हाला जर बदल दिसला नसेल तर तुम्हाला सशाच्या कानाजवळ बारीक निरीक्षण करावे लागेल. सशाच्या कानाजवळ तुम्हाला बदकाची चोच दिसेल त्यावरुन तुम्ही बदकाला शोधू शकता.