Pahalgam Terror Attack Fact Check Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळून आले. व्हिडीओसह असा दावा करण्यात आला आहे की, भारतीय सैन्याने सीमेवर युद्ध सुरू केले आहे. तसेच हा व्हिडीओ पाकिस्तानच्या लोकांनी शूट केल्याचा दावाही करण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतीय सैन्य पीओकेमधील घरांवर गोळीबार करीत असल्याचे म्हटले होते. पण खरंच भारतीय सैन्याने अशी कोणती कारवाई केली याबाबतचे सत्य जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर जितेंद्र प्रताप सिंह यांनी त्यांच्या प्रोफाइलवर हा व्हिडीओ शेअर केला.

इतर युजरदेखील त्याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही InVid टूलवर व्हिडीओ अपलोड करून आणि त्यातून कीफ्रेम्स मिळवून तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही कीफ्रेम्सवर एकेक करून रिव्हर्स इमेज सर्च केले.

यावेळी २४ ऑक्टोबर २०१९ रोजी एक्स युजर FJ ने अपलोड केलेला व्हिडीओ आम्हाला सापडला.

थ्रेडवरील पहिल्या पोस्टमध्ये म्हटले होते : नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानी सैन्यात सध्या जोरदार चकमक सुरू आहे.

२०१९ च्या एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी छावण्यांवर हल्ले केले, ज्यामध्ये तीन छावण्या उद्ध्वस्त झाल्या. त्यात पाकिस्तानी सैन्याचे सहा ते १० सैनिक मारले गेले. सूत्रांनी सांगितले की, कूपवाडाच्या तंगधार सेक्टरसमोरील नीलम खोऱ्यातील दहशतवादी लाँच पॅड तोफखाने हल्ल्यात उद्ध्वस्त झाले. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत ढकलण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या पाठिंब्याचा बदला म्हणून तोफखान्यावर हल्ला करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
https://www.ndtv.com/india-news/army-attacks-4-terror-camps-in-pakistan-occupied-kashmir-with-artillery-fire-sources-2119771

निष्कर्ष :

२०१९ मधील जुना व्हिडीओ आता भारतीय सैन्याने पीओकेवर केलेल्या गोळीबाराचा अलीकडील सांगून शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.