PAK Presenter Zainab Abbas About Leaving India: पाकिस्तानी क्रिकेट समालोचका झैनाब अब्बास अचानकपणे भारतातून निघून गेल्यावर आता पुन्हा चर्चेत आली आहे. झैनाबने आपल्याला भारतातून निघून जाण्यास सांगण्यात आल्याचे नाकारले आहे. क्रिकेट विश्वचषक कव्हर करत असलेली झैनाब अब्बास हिने भारत आणि हिंदू धर्माची कथितपणे थट्टा केल्यानंतर सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले होते. अब्बासने यानंतर आपल्याला ऑनलाईन प्रतिक्रिया पाहून भीती वाटत असल्याचे सांगितले होते आणि आता तिने सोशल मीडियावर सर्वांची माफी मागितली आहे.

अब्बासने X (पूर्वी ट्विटर) वर पोस्ट केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “ज्या पोस्ट प्रसारित केल्या गेल्या होत्या त्यामुळे दुखावलेल्या लोकांच्या भावना समजतात आणि त्याबाबत मला खेद वाटतो मी हे स्पष्ट करू इच्छिते की त्या पोस्ट मी आज काय आहे किंवा माझी मूल्ये यांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.”

झैनाब अब्बास विरुद्ध आरोप काय होते?

अब्बास ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) डिजिटल संघातील एक समालोचक असून तिने विश्वचषक सामन्यांचे कव्हरेज केले आहे. ती गेल्या आठवड्यात भारतात आली होती आणि नेदरलँड्सविरुद्ध पाकिस्तानच्या विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात वार्ताहर म्हणून तिने काम केले होते. पाकिस्तानच्या बंगळुरू , चेन्नई आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या अन्य सामन्यांना सुद्धा ती हजेरी लावणार होती.

दिल्लीतील एका वकिलाने तिच्या जुन्या पोस्ट्सबद्दल गेल्या आठवड्यात तिच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर अब्बासला भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून टीकेचा सामना करावा लागला.

विनीत जिंदाल यांच्या तक्रारीत असा आरोप आहे की अब्बासचे X (पूर्वीचे ट्विटर) वर अनधिकृत खाते होते ज्यातून तिने भारत आणि हिंदू धर्माबद्दल “अपमानकारक आणि संतापजनक पोस्ट” केल्या होत्या. या पोस्ट आता X वर उपलब्ध नाहीत, परंतु स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. जिंदाल यांनी अब्बासच्या करंट एक्स अकाउंटवरील ट्वीटचाही हवाला दिला ज्यामध्ये तिने काश्मीरच्या अधिकाराबद्दल लिहिले होते.

जिंदाल यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला पत्र लिहून अब्बास यांना आयसीसीचे सादरकर्ता म्हणून हटवण्याची मागणी केली होती.

झैनाब अब्बास ट्वीट

हे ही वाचा<< ‘लाज सोडून वागता’, पाकिस्तानी संघाचं स्वागत पाहून BCCI, जय शाहांवर नेटकरी भडकले; IND vs Pak बॉयकॉटची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झैनाब अब्बास हिचे उत्तर

यावर पुढे अब्बास हिने उत्तर देत म्हटले होते की, “तिच्या सुरक्षेला लगेचच धोका नसला तरी तिचे कुटुंबीय, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील मित्र चिंतेत होते, थोडा विचार करण्यासाठी मला वेळ हवा होता म्हणून मी स्वतः भारतातून निघून गेले पण नंतर तिला भारतातून हाकलून लावण्याच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या जे की चुकीचे आहे. मी वैयक्तिक कारणांसाठी भारत सोडला होता”