PAK vs ZIM Mr Bean: झिम्बाब्वे आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये ‘मिस्टर बीन वाद’ बराच चर्चेत आहेत. टी २० विश्वचषकात झिम्बाब्वेने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांनीही या वादाचा संदर्भ देत सामन्यानंतर पाकिस्तानला ट्रोल केलं आहे. झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या पोस्टवर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यानेही मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्राध्यक्ष इमर्सन डंबुडझो मनंगाग्वा यांनी ट्वीट मध्ये लिहिले की, पाकिस्तानने यापुढे तरी खरा मिस्टर बीन पाठवावा अशी अपेक्षा! यावर सेहवागचा रिप्लाय नेटकऱ्यांना फारच आवडला आहे.

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने खरंतर स्वतः सुद्धा काल पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वेच्या हाय व्होल्टेज सामन्यांनंतर दोन ट्विट केले होते. पहिल्या ट्विटमध्ये पाकिस्तानला ‘मिस्टर बीन’ म्हणत सेहवागने खिल्ली उडवली होती. झिम्बाब्वेच्या एका चाहत्याने केलेलं ट्विट रिट्विट करत सेहवाग म्हणाला की, “भाऊ खोट्या मिस्टर बीन पाकिस्तानचा तुमच्या संघाने काय बदला घेतला आहे.”

यानंतर आता राष्ट्राध्यक्ष इमर्सन डंबुडझो मनंगाग्वा यांच्या ट्वीटवरही रिप्लाय करत सेहवागने मिस्टर प्रेसिडेंट भी मस्त खेल गये, असं म्हंटलं आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष मनंगाग्वा यांनी कसा शेजाऱ्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले असेही म्हणत सेहवागने पाकिस्तानला चिमटा घेतला आहे.

PAK vs ZIM: विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडून सिकंदर रझा ठरला नंबर १! पाकिस्तानला हरवून रचला ‘हा’ विक्रम

दरम्यान, पाकिस्तानी बीन प्रकरण हे PCB ने शेअर केलेल्या एका फोटोवरून पेटलं आहे. असिफ मोहम्मद हा पाकिस्तानी स्टॅण्डअप कॉमेडियन मिस्टर बीनसारखा दिसतो आणि २०१६ साली तो झिम्बाब्वेला गेला होता. असिफ यांची ओळख ‘पाक बीन’ अशी आहे. हा फोटो पाहून निगुगी चासुरा या झिम्बाब्वेच्या चाहत्याने “आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही एकदा आम्हाला मिस्टर बीन रोवॅनऐवजी खोटा मिस्टर बीन दिला होता. आम्ही उद्या हे प्रकरण तुम्हाला पराभूत करुन मार्गी लावणार आहोत. पाऊस पडणार नाही प्रार्थना करा,” असा रिप्लाय केला होता.\

PAK vs ZIM Video: सिकंदर रझाने सकाळी रिकी पॉंटिंगचे ‘ते’ शब्द ऐकले अन सामन्यात पाकिस्तानला..

भारतानंतर झिम्बाब्वेनेही पाकिस्तानचा पराभव करून आज अवघ्या ऑस्ट्रेलियामध्ये अत्यंत तुफान खेळी दाखवली आहे. अवघ्या १३१ धावांचे लक्ष्य सुद्धा बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाला पूर्ण करता आले नाही. अवघ्या १ धावेने काल झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभूत केले आहे.