Pakistan Reporter Flood Video : पाकिस्तानमधील चहान धरणाजवळून लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना पुराच्या पाण्यात एक पत्रकार अक्षरश: वाहून जात असल्याचा थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरातील ही घटना असून, सततच्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचे कव्हरेज करत असताना हा क्षण हा कॅमेऱ्यात कैद झाला.
पत्रकाराचं रिपोर्टिंग करतानाचा थरारक क्षण (Shocking moment as reporter swept forward by floodwaters)
व्हिडिओमध्ये संबंधित पत्रकार कमरेइतक्या पाण्यात उभा राहून रिपोर्टिंग करताना दिसतो. काही क्षणांतच पाणी त्याच्या मानेजवळ पोहोचते आणि प्रवाह अधिकच वेगाने वाहू लागतो. तो उभा राहण्यासाठी धडपडतो आहे आणि शेवटी त्याचा तोल सुटतो. हातात माईक असलेला हात आणि डोकं इतकाच भाग दिसत असतानाच त्याला अचानक पाण्याचा जोर खाली खेचतो आणि तो पाण्यात वाहून जातो. पण पुढच्याक्षणी तो तो कसातरी स्वत:ला सावरतो अन् पुन्हा रिपोर्टिंग करू लागतो. व्हिडीओच्या शेवटपर्यंत पत्रकार रिपोर्टिंग करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ ‘अल अरेबिया इंग्लिश’ या माध्यमाने X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडियावर शेअर केल्यावर नेटिझन्समध्ये खळबळ उडाली. काहींनी या पत्रकाराच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी अशा परिस्थितीत रिपोर्टरला पाठवणे चूकीचे असल्याचे म्हटले. अनेकांना हा व्हिडिओ एआयने तयार केला आहे असे वाटले.
नेटकरी काय म्हणाले?
एका युजरने लिहिलं, “सुरुवातीला वाटलं एआयने बनवलेला व्हिडिओ आहे… पण नंतर समजलं की हे पाकिस्तानातील व्हिडीओ आहे.” तर दुसऱ्याने म्हटलं, “पाकिस्तानी पत्रकार बातमीमध्ये इतके गुंततात की, तेच स्वतःच बातमी बनतात.”
तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “ही चांगली पत्रकारिता आहे. इतरांनी लक्ष द्यावे.” चौथ्या X वापरकर्त्याने कमेंट केली की, “या माणसाला पुरस्काराची गरज आहे.”
पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती भीषण (Severe flooding in Pakistan due to torrential rains)
दरम्यान, पाकिस्तानदरम्यान, पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. पंजाब प्रांतात किमान ५४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी, १७ जुलै रोजी दिली. पाकिस्तान हवामान विभागाच्या मते, पंजाबमध्ये १ जुलै ते १५ जुलै दरम्यान गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १२४ टक्के जास्त पाऊस पडला, ज्यामुळे पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आणि आपत्कालीन मदतीला अडथळा निर्माण झाला.
देशभरात, अचानक आलेल्या पुरामुळे गावे पाण्याखाली गेली आहेत, हवामानशास्त्रज्ञांनी २०२४ च्या तुलनेत या जुलैमध्ये ८२ टक्के पावसाची वाढ झाल्याचे सांगितले आहे, ज्यामुळे आधीच असुरक्षित प्रदेशांमध्ये संकट आणखी तीव्र झाले आहे.